हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. आता याचं दरम्यान, तुनिषाच्या आईचा एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये तुनिषाची आई दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 26 डिसेंबर रोजी रात्री तुनिषाचा मृतदेह पाहण्यासाठी तिची आई रुग्णालयात पोहोचली. त्यावेळी तुनिषाला पाहताच तिची आई जागीच बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यांना नीट चालता देखील येत नव्हतं. यावेळी रुग्णालयातून बाहेर येतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
शीजानसोबतच्या ब्रेकअपमुळे तुनिषाने केली आत्महत्या
‘दास्तान-ए-काबुल ‘या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा मालिकेतील सहकलाकार शीजान खानने तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खरंतर, शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. शीजानने तिला धोका दिला असल्याचे म्हटलं जात आहे. ज्यामुळे ती सतत चिंतेत असायची. या प्रकरणात पोलिसांनी शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत.
हेही वाचा :