घरमहाराष्ट्रहुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलाची दुरवस्था

हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलाची दुरवस्था

Subscribe

खेळण्याच्या साहित्यांची मोडतोड
ग्रामीण भागातील खेळाडुंना सरावासाठी सर्व पायाभूत सुविधा असलेले मैदान असावे, त्याच ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी दर्जेदार साधने उपलब्ध होणे आवश्यक असते. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु क्रिडा संकुलाचीही उभारणी अशाच पद्धतीने करण्यात आली, परंतु त्यानंतर त्याची देखभाल झाली नाही, परिणामी या मैदानाची दुरवस्था झालेली दिसत आहे.
क्रिडा संकुल परिसरात लहान मुलांची खेळणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे या खेळण्यांच्या ठिकाणी हिरवीगार गार्डन लॉन तयार करण्यात आली होती. मात्र याकडे लक्ष न दिल्याने त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे.
हुतात्मा राजगुरु क्रिडा संकुल येथे पोलीस भरतीतील मुले, मुली सकाळ, संध्याकाळी या ठिकाणी सराव करत असतात. त्याच बरोबर कबड्डी, लांब उडी अशा अनेक खेळांचे सराव या ठिकाणी सुरू असतात. या खेळाडुंना योग्य त्या सुविधा पुरविण्यात क्रिडा विभाग कमी पडत आहे. येथील शौचालयाचीही दुरवस्था होत चालली आहे.
क्रिडा संकुलामध्ये विद्यार्थी, लहान मुले, क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडू असे सर्वजण येत असतात. त्यामुळे या परिसरात हव्या त्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे. जर अशी दुरवस्था असेल तर ही बाब गांभिर्याची आहे, तर त्वरित मी स्वत: पाहणी करून योग्य ती कारवाई करणार आहे.
– आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, खेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -