घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात ५०० मुली लव्ह जिहादच्या शिकार; लॅण्ड जिहादलाही जोर; सुरेश चव्हाणके यांचा...

नाशकात ५०० मुली लव्ह जिहादच्या शिकार; लॅण्ड जिहादलाही जोर; सुरेश चव्हाणके यांचा खळबळजनक दावा

Subscribe

नाशिक : नाशिकमध्ये लव्ह जिहादला जोर आला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात 500 मुली लव्ह जिहादच्या शिकार झाल्या आहेत. लव्ह जिहादप्रमाणेच नाशकात लॅण्ड जिहाददेखील फोफावला असून, सुमारे 500 जागांचे क्षेत्रफळ जिहादींनी गिळंकृत केले आहे. याच नाशिकमधून सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर आपण लंकेपर्यंत जाऊन रावणाला मारले. आपल्या आजबाजूलाही रावण पसरले आहेत. त्यांना शोधून काढायचे आहे. त्यामुळे माता-भगिनींच्या रक्षणासाठी हिंदुनो, एकत्र या अशी गर्जना सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केली.

हिंदू सकल समाजतर्फे शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी (दि.२२) सकल हिंदू समाजतर्फे हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चव्हाणके बोलत होते. व्यासपीठावर आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरीगिरी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री १००८ महामंडलेश्वर रघुनाथ बाबा (फरशीवाले), जगदगुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे उपस्थित होते.

- Advertisement -

सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, भारतीयांना सशस्त्र क्रांतीची हाक देणारे वीर सावरकर याच पुण्यभूमीत जन्मले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्याची शपथ सावरकरांनी याच नाशिकमध्ये घेतली. महाराष्ट्रावर दिीची आक्रमणे झाली ती गुजरातमार्गे नाशिकमधूनच. मुघल आक्रमणांना सर्वप्रथम रोखले ते नाशिककरांनीच. अद्याप ही आक्रमणे सुरुच असून, आज पाडव्याच्या दिवशी पूर्वजांना स्मरण करुन माता-भगिनींची इभ्रत वाचविण्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, नव्या पिढीवर संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल. तेव्हा नवीन पिढीवर संस्कार करण्यावर भर द्या. देवभक्ती, देशभक्तीचे पाठ पढवा. संपूर्ण जगात केवळ भारत देशाला भारतमाता म्हटले जाते. इतर कुठल्याही देशाला माता म्हटले जात नाही. हीच आपल्या धर्माची महती आहे. ही महती मुलांना शिकवा. राष्ट्रहितासाठी एकत्र या तरच धर्म टिकेल. महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे मौनव्रत असल्याने त्यांचा संदेश ब्रम्हचारी नागेेश्वरानंदजी महाराज यांनी वाचून दाखविला. ते म्हणाले की, शहर-ग्रामीण भागातील लव्ह जिहाद, गोहत्या रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे करायला हवे. देशात हिंदू सुरक्षित असला तरच देश टिकेल.

- Advertisement -

प्रास्ताविक स्वामी भारतानंदजी यांनी केले. राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल प्रत्येकाने प्रेम बाळगायला हवे. परंपरा व धर्म जपणे गरजेचे आहे. सकल हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये इतर धर्मांचाही सन्मान केला जातो. मात्र, इतर धर्मियांनीही हिंदू धर्माचा आदर राखायला हवा. जोपर्यंत साधुसंतांची हत्या रोखल्या जात नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होणार नाही. विश्वरत्न सावरकरांना भारतरत्न दिल्यास भारत रत्नचीच शान वाढणार आहे, असेही ते म्हणाले. आदिवासी पाड्यांवर पैसे देऊन धर्मांतर केले जाते हे सांगतांना त्यांनी घटनाक्रमांचाही उेख केला. मालेगावमध्ये गोरक्षक मच्छिंद्र शिर्केवर हा झाला मात्र हेखोरांवर अद्याप कारवाई झाली नाही. राष्ट्रभक्ती, धर्मभक्तीसाठी संन्यास स्विकारल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी जैन साध्वी मधुस्मिताजी महाराज, स्वामी सोमेश्वरानंदजी महाराज यांची यथोचित भाषणे झाली. याप्रसंगी सुरेश चव्हाणके यांना धर्मयोध्दा ही पदवी प्रदान करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -