घरनवी मुंबईमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरीलअपघात घटनेतील चालकाचा शोध सुरु

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरीलअपघात घटनेतील चालकाचा शोध सुरु

Subscribe

गुरुवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन वर खोपोली एक्झिट या ठिकाणी द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक थांबवलेली होती. त्यावेळेस पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणार्‍या ट्रक (केए ०५/३१०५) यावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर थांबलेल्या वाहतुकीमधील एकूण अकरा वाहनांना पाठीमागून ठोकर मारून अपघात केला आहे.

खोपोली: गुरुवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन वर खोपोली एक्झिट या ठिकाणी द्रुतगती मार्गाचे काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक थांबवलेली होती. त्यावेळेस पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणार्‍या ट्रक (केए ०५/३१०५) यावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर थांबलेल्या वाहतुकीमधील एकूण अकरा वाहनांना पाठीमागून ठोकर मारून अपघात केला आहे. या अपघातामध्ये एकूण सहा व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, अपघात स्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तर चालकाविरुद्ध भादवि २७९, ३३७,३३८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी पळुन गेला असुन पोलीसांकडून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

अपघातग्रस्त वाहने
१. MH-०१-CR -१७४५,
२. MH-४८-AW-७११४,
३. MH -२०-EY-८८४१,
४. MH-१२-HN-४४२७,
५. MH-०२-BZ-३८४५,
६. MH-४६-X-४२६९,
७. MH-२२-AN-०८१८,
८. MH-०१-BU-९७४५,
९. MH-१४-KQ-०३०५,
१०. MH-०३-BC-६९१४,
११. MH-१२-TN-७५२०.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -