घरमुंबईएसटीतील ‘दाऊद’ अखेर निलंबित

एसटीतील ‘दाऊद’ अखेर निलंबित

Subscribe

पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या भावाची कागदपत्रे सादर करून थेट एसटी प्रशासनाच्या को -ऑप. बँकेत नोकरी मिळविणार्‍या दाऊदला अखेर निलंबित करण्यात आले आहे. ‘आपलं महानगर’ने या प्रकाराचा पर्दाफाश करणारे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आला आहे. या चौकशीच्या अहवालानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले.

90 हजार एसटी कर्मचारी सभासद असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेला दाऊद शेख या इसमाने फसविल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. ज्यात दाऊदने आपल्या सख्या भावाच्या कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळविल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दाऊदचा भाऊ खालेद शेख जालना पोलीस खात्यामध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर दाऊद जालना एसटी बँकेच्या शाखेत शिपायाच्या हुद्यावर 1६ वर्षांपूर्वी नोकरीला लागला होता. नोकरी मिळवण्यासाठी दाऊदने एसटी बँकेची दिशाभूल करत खालेद शेखची शैक्षिक कागदपत्रे सादर केली होती.

- Advertisement -

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत अनंतपुरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. श्रीकांत अनंतपुरे म्हणाले की, दाऊदला निलंबित करण्यात आले आहे. आम्ही बँकेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून. चौकशीच्या अहवालानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -