घरमुंबई‘पडद्यांतून’ कोकेन तस्करी करणारे, मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

‘पडद्यांतून’ कोकेन तस्करी करणारे, मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

Subscribe

तस्करी करणाऱ्या चार नायजेरियन्सच्या या टोळीत एका महिलेचादेखील समावेश आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आंबोली पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरीन टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी पडद्याच्या रिंग्स तसंच शिलाई मशीनमध्ये दडवलेलं सुमारे ६ किलो ४९२ ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. याशिवाय या टोळीकडून कापडी पडदे, पडद्याच्या रिंग्स, पुठ्ठे, प्रेस मशीन, प्लास्टिक नळी आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत जवळपास ३८ कोटी ९७ लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार नायजेरियन्सच्या या टोळीत एका महिलेचा समावेश असून, ही महिला आणि टोळीतील एक पुरुष आरोपी हे नुकतेच अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. निरस अबुझिक आखोवा (३५),सायमन अगोबता (३२), मायकल संदे होप (२९) कार्ले पिंटो आयरिस (ब्राझीलीयन महिला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

सविस्तर घटना…

आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी त्यांच्या पथकासह, अंधेरी पश्चिम मौर्या इस्टेट रोड या ठिकाणी शनिवारी दुपारी सापळा रचत निरस अबुझीक आखोवा याला ताब्यात घेतले. त्यावेळी अबुझीक याच्याजवळ काही पडदे होते. या पडद्यांची तपासणी केली असता पोलिसांना त्यामध्ये कोकेन पुठ्यात बांधलेल्या काही पुड्या मिळाल्या. त्यामुळे  पोलिसांनी त्याला त्वरित अटक करून पोलीस ठाण्यात नेले. पुढील चौकशीदरम्यान अबुझीक याने  आपल्या सहकार्यांची नावं आणि पत्ते दिले. या माहितीनुसार पोलिसांनी सर्व ठिकाणांवर छापा टाकून इतरांना अटक केली आणि त्यांच्याकडून कोकेन, पडदे, रिंग ,नळ्या आदी सामान जप्त केले. पश्चिम उपनगराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

- Advertisement -

आरोपींची अनोखी शक्कल

पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून तस्करांनी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली. तस्करीसाठी त्यांनी दारं-खिडक्यांना लावण्यात येणाऱ्या पडद्याचा वापर केला. कुणाला पटकन संशय येऊ नये यासाठी कोकेनेच्या पुड्या या पडद्यांच्या रिंगमध्ये लपवून त्याची तस्करी केली जात असल्याचं सत्य तपासादरम्यान समोर आलं.

पडद्यांमधून केली जायची तस्करी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -