घरमुंबईपनवेल पालिकेच्या व्यापारी संकुलात लवकरच पोस्ट कार्यालय

पनवेल पालिकेच्या व्यापारी संकुलात लवकरच पोस्ट कार्यालय

Subscribe

पनवेलचे जुने पोस्ट कार्यालय गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झाल्याने बंद आहे. त्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपात नवीन पनवेल येथील मुख्यालयात सुरू होते. गेल्या 50 वर्षांपासून असलेले पोस्ट कार्यालय प्रशासनाने तडकाफडकी बंद केल्याने पेन्शनधारकांसह हजारो पनवेलकरांची प्रचंड गैरसोय झाली होती. पनवेल महापालिकेच्या व्यापारी संकुलात पोस्ट ऑफीससाठी जागा प्रस्तावीत होती. मात्र आता करारनामा तयार करून घेतल्याने तांत्रिक बाबींचा अडथळा दूर होऊन पनवेल पोस्ट ऑफीस पुन्हा सुरू होणार आहे.

पनवेल शहरातील महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरूजी शाळेच्या बाजूला पनवेलचे जुने पोस्ट कार्यालय होते. याबाबत वाद होता तो न्यायालयात सुध्दा गेला. या अनेक कारणामुळे पनवेलचे हे पोस्ट कार्यालय बंद करून ते नवीन पनवेल येथील मुख्य कार्यालयात हलविण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांची गैरसोय होत होती. अनेक गोष्टींकरीता त्यांना थेट नवीन पनवेल गाठावे लागत होते. दरम्यान याकरीता पर्यायी जागा महापालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली होती. तसा ठराव सुध्दा महापालिकेत करण्यात आला होता. परंतु कागदपत्राची पुर्तता होत नसल्याने हा प्रस्ताव टेबलावर पडून होता. शिवसेना महानगर संघटक अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी पाठपुरावा सुरू केला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी या कामात लक्ष घातले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -