घरदेश-विदेशसुरक्षा दलाने हाणून पाडला पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न

सुरक्षा दलाने हाणून पाडला पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न

Subscribe

भारताच्या सीमा सुरक्षा दलाने घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या ड्रोनला माघारी फिरवले आहे. हे ड्रोन हेरगिरीसाठी भारतात घुसखोरी करत होते. परंतु, सतर्क असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केला त्यामुळे पाकिस्तानी ड्रोनला पळता भुई थोडी झाली.

पाकिस्तानचा माज काही केला कमी होताना दिसत नाही. एकीकडे शांततेचे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान करत आहे, तर दुसरीकडे सीमाभागातून शस्त्रसंधीचे उल्लंघन तर कधी ड्रोनमार्फत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भारतीय सुरक्षा दल सतर्क आणि शक्तीशाली असल्यामुळे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात आहे. भारताने पाकिस्तानचा असाच एक प्रयत्न आजही हाणून पाडला आहे. पाकिस्तानी ड्रोनने राजस्थानच्या सीमेवरुन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी ते ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पाकिस्तानी ड्रोनला पळता भुई थोडी झाली.

सकाळी पाचच्या सुमारास केला प्रयत्न

पाकीस्तानी ड्रोनने सकाळी पाच वाजेच्या सुमारास श्रीगंगानगर जवळ असलेल्या हिंदूमालकोट सीमेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे ड्रोन परिसरात तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस पडले. त्यांनी लगेच गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे ड्रोन लगेच माघारी फिरले आणि पळून गेले. गोळीबार सुरु होताच ड्रोन लगेच माघारी फिरले, असे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी म्हणाले. या गोळीबाराचा आवाज पश्चिम सीमेजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी देखील ऐकला. गेल्या सहा दिवसांत भारतात हेरगिरीसाठी ड्रोन पाठवण्याचा पाकिस्तानने हा दुसरा प्रयत्न केला आहे. हे दोन्ही प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -