घरमहाराष्ट्रसात नक्षलवाद्यांना खात्मा करणाऱ्या पोलिसाचा अकस्मात मृत्यू

सात नक्षलवाद्यांना खात्मा करणाऱ्या पोलिसाचा अकस्मात मृत्यू

Subscribe

गडचिरोली भागात गेल्या वर्षी सात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. योगेश गुजर असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळ पिंपरी-चिंचवड येथील होते. त्यांच्यावर आज सकाळी पिंपरी भाटनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. गेल्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता.

त्यांच्या अकस्मात मृत्यूची वार्ता शुक्रवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समजल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव आज सकाळी पाऊने सातच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे अनेकांना अश्रू अनावर होत नव्हते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. योगेश गुजर यांची कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख होती. सुरवातीला दोन वर्षे सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते.

- Advertisement -

हे वाचा – बाळाला जन्म देणारा ‘तो’ जगातील पहिला पुरुष ठरला

एक वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीही त्यांच्या समवेत रहात होत्या. योगेश यांचे वडील सैन्यदलात सुभेदार पदावर सेवेत होते. योगेश यांचे शिक्षण खडकीतील बी.जे. स्कुल मध्ये झाले असून २००८ पासुन ते चिंचवड येथील समर्थ कॉलनीमध्ये रहात होते. २०१३ च्या बॅच मध्ये ते उत्तीर्ण होऊन पोलीस दलात दाखल झाले. गेल्या वर्षी त्यांनी सात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले होते. ते नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी नेहमी तत्पर असायचे. मात्र त्यांच्या अकस्मात मृत्यू ने सर्वांनाच धक्का बसला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

हे वाचा – जाणत्या राजाच्या मध्यस्थीने दोन राजेंमधील वाद मिटले 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -