घरमुंबईनिवडणुकांचा फटका म्हाडा लॉटरीला; घरांची सोडत लांबणीवर

निवडणुकांचा फटका म्हाडा लॉटरीला; घरांची सोडत लांबणीवर

Subscribe

मुंबईत हक्काच्या घरांकरिता म्हाडाच्या सोडतीसाठी वाट बघत असणाऱ्यांना काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

म्हाडाने मुंबईतील २१७ घरांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठीची सोडत २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार होती. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. आता हक्काच्या म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्यांना २३ मे रोजी म्हणजेच निवडणूक निकालानंतरच दिलासा मिळणार आहे. यामुळेच, मुंबईत हक्काच्या घरांकरीता म्हाडाच्या सोडतीसाठी वाट बघत असणाऱ्यांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूका झाल्यानंतरच ही सोडत जाहीर होईल.

मतमोजणीनंतर म्हाडाच्या घरांची सोडत

मागील आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे म्हाडाची सोडत जाहीर करता येणार नाही. म्हाडाने आचारसंहितेपूर्वी सोडत काढण्याचे जाहीर केले होते. यानुसार बँकेत अनामत रक्कम भरुन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल रोजी दिली होती. त्यानंतर ही सोडत ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे म्हाडाची ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची एकूणच मतमोजणी झाल्यावरच म्हाडाच्या घरांची सोडत होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सोडत किमान एक महिना पुढे ढकलण्यात आली. तरी, अर्जाच्या मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १३ एप्रिल हिच तारिख अर्जासाठी अंतिम मुदत आहे.

- Advertisement -

२३ मे नंतरच सोडत जाहीर

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार असून म्हाडाच्या सोडतीचा मार्ग मोकळा होणार आहे. घरांची सोडत कधी जाहीर होईल, हे २३ मे नंतरच जाहीर करण्यात येईल असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -