घरमुंबईनिवडणुकीतील गैरप्रकार दाखवा, बक्षीस मिळवा

निवडणुकीतील गैरप्रकार दाखवा, बक्षीस मिळवा

Subscribe

आयकर अन्वेषण विभागाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत अवैध पैशांच्या, वस्तुंच्या वापराबाबत माहिती देणार्‍यांना आयकर अन्वेषण विभागामार्फत बक्षीस मिळणार आहे. माहिती देणार्‍यांना कोणताही वैयक्तीक तपशील विचारला जाणार नाही. टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवून नागरिकांना लोकसभा निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी योगदान देता येईल, अशी माहिती आयकर अन्वेषण विभागाचे महासंचालक के.के. व्यवहारे यांनी दिली. निवडणुकी दरम्यान कोणत्याही अपप्रकाराबाबतची माहिती विभागाच्या कंट्रोल रूममार्फत गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्टीकरण व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत दिले. याकरता संबंधितांनी 1800221510 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकसभा २०१४ निवडणुकीत कंट्रोल रूमकडे १२५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पण आयकर विभागाच्या मर्यादित यंत्रणेमुळे सगळ्या तक्रारींचा पाठपुरावा करणे विभागाला शक्य झाले नाही, अशी कबुली त्यांनी दिली. मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघासाठी क्वीक रिस्पॉन्स टीम नेमण्यात आली आहे. आमच्या यंत्रणेकडे माहिती उपलब्ध झाल्यावर एका तासाच्या आत तत्काळ त्या माहितीवर कारवाई करण्यात येईल. संपूर्ण निवडणुकीसाठी विभागाच्या २०० जणांची टीम कार्यरत असणार आहे. निवडणूक आयोगासारखेच आमच्या विभागाचे ऑब्झर्व्हर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेमण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात होणार्‍या खर्चावर नजर ठेवण्याचे काम या टीमकडून होणार आहे. विमानतळाच्या ठिकाणी कारवाईसाठी एअर इंटेलिजन्स टीम काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक एअरपोर्ट तसेच हेलिकॉप्टर फेर्‍या देखील या यंत्रणेकडून मॉनिटर केल्या जातील. सीआयएसएफ तसेच आरपीएफ यासारख्या सुरक्षा यंत्रणांसोबतही आयकर अन्वेषण विभागाकडून समन्वय साधला जात आहे.

- Advertisement -

निवडणुकांच्या आधीच काही ठिकाणी सहकारी संस्था व बँकांच्या पैसे हस्तांतरणशी संबंधी आतापर्यंत प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ३५ कोटी रोख रक्कम आतापर्यंत जप्त करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीन स्थरावर विभागाची यंत्रणा काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा पुरेसे मनुष्यबळ विभागाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे आहेत महत्वाचे नंबर

टोल फ्री क्रमांक – १८००२२१५१०
दूरध्वनी क्रमांक – २२८२०५६२
मोबाईल / वॉट्स अ‍ॅप – 9372727823 / 9372727824

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -