घरमहाराष्ट्रधोकादायक पादचारी पूल पाडणार; मध्य रेल्वेचा निर्णय

धोकादायक पादचारी पूल पाडणार; मध्य रेल्वेचा निर्णय

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर धोकादायक पादचारी पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेने मुंबईकरांचं मन हेलावून टाकलं आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पालिकेने ही जबाबदारी रेल्वेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा पूल पालिकेच्याच अख्त्यारित असल्याची उपरती पालिकेला आली होती. तसेच एलफिन्स्टन आणि अंधेरी पूल दुर्घटनेवेळीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसाच प्रयत्न सीएसटीएम पूलाच्या वेळी करण्यात आला. मात्र त्याची महापालिकेने जबाबदारी घेतली. तसेत स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने त्यांच्या अख्त्यारीतील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेतर्फे हे पूल पाडण्यात येणार

मध्य रेल्वेतर्फे भांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत. पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या कार्यवाहीस सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी नीरज देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निरज देसाईची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध ३०४ अ (निष्काळजीपणा २ वर्षे शिक्षा) हे कलम काढून ३०४ भाग २ हे कलम लावण्यात आले आहे. ज्यामध्ये १० वर्षे शिक्षा होवू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -