घरमुंबईठाण्यातील ५ लाख नवमतदार कुणाच्या पथ्यावर?

ठाण्यातील ५ लाख नवमतदार कुणाच्या पथ्यावर?

Subscribe

जिल्हयात पाच वर्षात पाच लाख मतदार वाढल्याने या नवमतदारांना आकर्षित करण्याकडेच सर्वच राजकीय पक्षांचा ओढा असणार आहे.

ठाणे जिल्हयात कल्याण भिवंडी आणि ठाणे हे तीन लोकसभा मतदार संघ येतात. प्रत्येक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वाधिक मतदारांची संख्या असलेला मतदार संघ ठरला आहे. ठाण्यात २३ लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून, १२ लाख ६० हजार पुरूषांची संख्या आहे. ठाण्यात ३६ अनिवासी भारतीय मतदार आहेत. कल्याण लोकसभेत १९ लाख २७ हजार तर भिवंडी मतदार संघात १८ लाख ५८ हजार मतदारांची संख्या आहे.  २००४, २००९ च्या लाेकसभा निवडणुकीत तृतीय पंथी अशी नोंद नव्हती. २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच पुरूष व स्त्री मतदारांबरोबच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. २०१४ मध्ये ३२ तृतीय पंथीयांनी नोंद होती. मात्र, यंदा ३४०  मतदारांची नोंदणी झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याणामध्ये सर्वाधिक १८४  तृतीय पंथीयांची नोंद  झाली आहे. तर ३८८३ अपंग मतदारांची नोंद झाली आहे. जिल्हयात पाच वर्षात पाच लाख मतदार वाढल्याने या नवमतदारांना आकर्षित करण्याकडेच सर्वच राजकीय पक्षांचा ओढा असणार आहे.
ठाणे जिल्हयात एकूण ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांची संख्या असून, त्यापैकी ३३ लाख २१ हजार ७५८  पुरूष मतदार तर  २७ हजार  ७० हजार  ९४९ स्त्री मतदारांची संख्या आहे.  तृतीय पंथीय  ३४० मतदार असून  ४० अनिवासी भारतीय मतदार नोंदविण्यात आले आहेत.  ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा ५ लाख ८० हजार ७८३ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवीन मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याकडं सर्वांचे लक्ष वेधलंय.

 ठाणे जिल्हयातील लोकसभा मतदार संघ

लाेकसभा       पुरूष              स्त्री                तृतीयपंथी        अनिवासी भारतीय       सैनिक मतदार 
भिवंडी         १०,२०,९१२         ८,३७,२१८            ११३                       ०४                                        ५४४
कल्याण       १०,४०,७९३         ८,८६,६३१            १८४                      ००                                         ४४६
ठाणे             १२,६०,०५३        १०,४७,१००           ४३                       ३६                                          ५०३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -