घरदेश-विदेशलोकसभा निकाल २३ मे ऐवजी सहा दिवस उशीरा?

लोकसभा निकाल २३ मे ऐवजी सहा दिवस उशीरा?

Subscribe

निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात त्यासंबंधी दावा केला आहे.

निवडणुका पारदर्शी व्हाव्या यासाठी आयोगाने व्हीव्हीपॅट मशीन आणली. मात्र २१ विरोधी पक्षातील नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल करुन किमान एका मतदार संघातील ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्यात यावी अशी मागणी केली. सदर याचिकेवर न्यायलयाने आयोगाला स्पष्टीकरण विचारले असता, विरोधी पक्षाची याचिका अवलंबात आणायची झाल्यास निवडणूक निकाल येण्यास किमान ६ दिवस जास्तीचे लागतील असे निवडणुक आयोगाने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुक वेळापत्रकातील निकालाची २३ मे ही तारीख पुढे ढकलली जाउ शकते.

काय आहे याचिका

लोकसभा निवडणुक २०१४ नंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये इव्हीएम वरील कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपलाच जाते असे काही प्रकार समोर आले होते. त्यामुळे व्हीव्हीएम मशीन या मतदान प्रक्रियेवर लोकांनी संशय व्यक्त केला होता. पुन्हा एकदा मतपत्रीकांची जुनीच पद्धत अवलंबली जावी अशी मागणी केली. मात्र व्हीव्हीपॅट हा पर्याय पुढे आला. व्हीव्हीपॅट मशीनमुळे मतदाराला आपण ज्या चिन्हा समोरील बटन दाबत आहोत, त्याच चिन्हाची एक मत पत्रिका प्रत बाहेर येईल. मतदान प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप जुळवुन पडताळणी करावी अशी मागणी २१ विरोधी पक्षांनी केली आहे. मत मोजणीला उशीर होईल मात्र निवडणुक प्रक्रिया पारदर्शी होईल असे काँग्रेससह २१ विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

काय आहे आयोगाचे म्हणणे

निवडणुक आयोगाकडून न्यायालयाने या याचिके संदर्भात उत्तर मागितले असता आयोगाने या प्रक्रियेसाठी किमान ६ ते ८ दिवसांचा अतिरिक्त कालावधी लागेल असे सांगितले आहे. आधीच निवडणुक प्रक्रियेसाठी आयोगाकडे मन्युष्यबळ कमी आहे. अशा प्रकारे व्हीव्हीपॅट मोजणीसाठीची कोणतीही यंत्रणा सध्यातरी उपलब्ध नाही. त्यात जर ५० टक्क्यांपर्यंत मतपत्रिका जुळवायचे म्हटल्यास अतिरिक्त वेळ आणि मनुष्यबळ देखील लागेल. त्यामुळे ३१ मे च्या आधी निकल येणार नाही असे आयोगाने म्हटले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -