घरमहाराष्ट्रकोल्हापुरात हॅकर्सचा थैमान; ६७ लाखांची ऑनलाईन चोरी

कोल्हापुरात हॅकर्सचा थैमान; ६७ लाखांची ऑनलाईन चोरी

Subscribe

कोल्हापुरच्या एचडीएफसी बॅंकेत ६७ लाखांची ऑनलाइन चोरी झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन ट्रांजेक्शन कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

कोल्हापुरच्या एचडीएफसी बॅंकेत हॅकर्सने थैमान घातले आहे. या हॅकेर्सनी एचडीएफसी बॅंकेवर ऑनलाईन दरोडा टाकत ६७ लाख रुपयांची चोरी केली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी येथील एचडीएफसीच्या शाखेवर हॅकर्सनी हा दरोडा टाकला आहे. हॅकर्सने एवढी मोठी रक्कम लंपास केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, याप्रकरणी अध्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींचा शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ऑनलाइन कितपत सुरक्षित?

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन ट्रांजेक्शन कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी नागरिकांना ऑनलाइन बॅंकिंगचा सल्ला दिला. नोटबंदीनंतर ऑनलाइन बॅंकिंग हाच पर्याय नागरिकांकडे उपलब्ध होता. मात्र, या ऑनलाइन बॅंकिंगमध्ये बऱ्याच वेळा गडबड झाल्याचा प्रकार याअगोदरही समोर आला आहे. याशिवाय, हॅकर्स हे यापुढील मोठे आव्हान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -