घरमनोरंजनसोनाली सहगलही कास्टिंग काउचची शिकार; दिग्दर्शकाने केली 'ही' मागणी

सोनाली सहगलही कास्टिंग काउचची शिकार; दिग्दर्शकाने केली ‘ही’ मागणी

Subscribe

दररोज बॉलिवूडमधील एक कास्टिंग काउचचा प्रकार समोर येतो. अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत अनेक दिग्गजांची नावं यात घेतली आहेत. आता प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगलने कास्टिंग काउचवर नवीन खुलासा केला आहे. सोनालीने केलेला खुलासा ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

सोनालीचा धक्कादायक खुलासा

सोनाली म्हणाली, मला फिल्म देण्याची नावाखाली एका दिग्दर्शकाने मला बॉडी सर्जरी करायला सांगतिले. माझी ऑडीशन देखील चांगली झाली होती. तरी मला बॉडी सर्जरीची अट घालण्यात आली. माझी ऑडीशन चांगली झाल्यामुळे मी खूप खूष होते. पण ही अट ऐकल्यावर मी हैराण झाले. माझ्या बॉडीच्या काही विशिष्ट भागांची ही सर्जरी करायला सांगितली होती. त्यांच म्हणणं होतं की यामुळे मी अजून आकर्षक दिसले असते. पण मी त्यांची ही अट मान्य केली नाही आणि चित्रपट माझ्या हातून निघून गेला.

- Advertisement -

आतापर्यंत सोनाली सहा चित्रपटांमध्ये दिसली. तीने आपल्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली. पहिल्यांदा ती प्यार का पंचनामा मध्ये दिसली. लवकरच ती प्यार का पंचनामा २ चा अभिनेता सनी सिंह याच्याबरोबर जय ममी दी मध्ये दिसेल. दिग्दर्शक नवजोत गुलाटी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -