घरक्रीडाभारतीय प्रसारमाध्यमे टीम इंडियावर नाराज

भारतीय प्रसारमाध्यमे टीम इंडियावर नाराज

Subscribe

भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या एक दिवस अगोदरच भारतीय प्रसारमाध्यमे संघावर नाराज झाले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना ५ जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना साऊथ आफ्रिकेसोबत असणार आहे. दरम्यान, सामन्याअगोदरच भारतीय प्रसारमाध्यमे संघावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी संघाच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला आहे. कारण सामन्याअगोदर आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संघाकडून खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवण्यात आले होते.

म्हणून प्रसारमाध्यमांनी टाकला बहिष्कार

विश्वचषक स्पर्धेतील किंवा कोणत्याही सामन्याच्या एक दिवस अगोदर भारतीय संघ पत्रकार परिषद घेतो. बुधवारी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना खेळला जाणार आहे. त्याअगोदर मंगळवारी भारतीय संघाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील एखादा वरिष्ठ खेळाडू येणे अपेक्षित होते. मात्र, ते न आल्यामुळे भारतीय प्रसारमाध्यामांचे प्रतिनिधी नाराज झाले. त्यामुळे सर्व भारतीय प्रसारमाध्यमांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे भारतीय संघातकडून पाठवण्यात आलेले खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर हे सरावासाठी फक्त नेट्समध्ये गोलंदाजी करण्याठी गेले आहेत. त्यांचा मुळ संघाशी काहीही संबंध नाही. तरीही फक्त त्यांनाच पत्रकार परिषदेत पाठवण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – लॉर्ड्सवर होणारी अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -