घरमुंबईविक्रोळीत कारमध्ये सापडला मृतदेह; कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता

विक्रोळीत कारमध्ये सापडला मृतदेह; कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता

Subscribe

विक्रोळी येथे एका टुरिस्ट कारमध्ये एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विक्रोळी पश्चिम येथील कैलास कॉम्पलेक्स, वीर सावरकर मार्ग या ठिकाणी एका बंद कारमध्ये गुरुवारी सकाळी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पार्कसाईड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून मृत इसमाची ओळख पटवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमके काय घडले?

सुरेश संभाजी डबरे (४०) असे या मृत इसमाचे नाव असून तो विक्रोळी पश्चिम येथील वर्षा नगर येथे राहणारा आहे. सदरची कार हि सुरेश डबरे याच्याच मालकीची असून ती कर टुरिस्टसाठी तो स्वतः चालवत होता. त्याचा या कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सुरेश डबरे हा पत्नी आणि मुलासह वर्षनगरमध्ये राहण्यास होता. उन्ह्याच्या सुट्टीत पत्नी आणि मुले माहेरी गेल्यामुळे सुरेश हा एकटाच घरी राहण्यास होता. गुरुवारी सकाळी सुरेशची कार  वीर सावरकर मार्ग विक्रोळी पश्चिम येथे रस्त्यावर उभी होती, त्याच्या कारमधून दुर्गंधी येत असल्यामुळे एका पादचाऱ्याने कारच्या काचेतून डोकावून बघितले असता त्यात एका पुरुषाचा मृतदेह असल्याचे पादचाऱ्यांचा लक्षात आले. त्याने याबाबत पोलिसांना कळवले असता घटनास्थळी आलेल्या पार्क साईड पोलिसांनी कारच्या काचा तोडून कारचा दरवाजा उघडला असता चालक सीटवर सुरेश डबरे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश डबरे या इसमाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता असून कारच्या काचा दरवाजे बंद असल्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु असल्याचे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -