घरहिवाळी अधिवेशन २०१८मराठ्यांना मिळालं धनगरांना कधी मिळणार; विरोधकांचा सवाल

मराठ्यांना मिळालं धनगरांना कधी मिळणार; विरोधकांचा सवाल

Subscribe

मराठा आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतील आमदारांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. धनगर समाजाला एसटीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे रामराव वडकुते आणि काँग्रेसच्या हरीभाऊ राठोड यांनी लावून धरली. धनगड या शब्दाचा अपभ्रंष धनगर असा झाला आहे, त्यामुळे सरकारने या शब्दाची दुरुस्ती करुन तात्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी आमदारांनी केली.

धनगर आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आकाडतांडव करु नये, धनगरांना आरक्षण देण्यासाठी सवैंधानिक प्रक्रिया आहे, ती पूर्ण करुनच आरक्षण मिळवावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. धनगर समाजाला सध्या एनटी प्रवर्गात आरक्षण आहेच. मात्र त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी किचकट अशी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे याबद्दल घाईघाईत निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

तर धनजंय मुंडे यांनी टीसच्या अहवालावर कृती अहवाल मांडा, अशी मागणी केली. तसेच एका समाजाला आरक्षण देण्यासाठी टीस सारख्या खासगी संस्थेला सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -