घरहिवाळी अधिवेशन २०१८धनगर-मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्या

धनगर-मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्या

Subscribe

राज्य सरकारने काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधेयक आणले. आरक्षण मिळणार म्हणून मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता धनगर-मुस्लिम समाजाला आरक्षण कधी देणार? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. कारण हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता दोन्ही समाजाकडून आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्यातच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर-मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी आज लावून धरली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठा संगर्ष करावा लागला. अनेक मोर्चे काढले, काही तरुणांनी आत्महत्या केली, तेव्हा कुठे जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मग आता धनगर आणि मुस्लिम समाजालानेही अशाच प्रकारे संघर्ष करायचा का? तसेच पुढच्या अधिवेशनात देखील विरोधकांनी पहिल्या दिवसांपासून आरक्षणाचाच मुद्दा लावून धरायचा का? त्यापेक्षा सरकारने वेळ न घालवता आरक्षण जाहीर करुन टाकावे. पुढच्याच महिन्यात सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

मुस्लिमांना SEBC मध्ये आरक्षण द्या – नसीम खान

आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण दिले होते. मात्र युती सरकारने ते टिकवले नाही. मुस्लिम समाजातील जे लोक मागास आहेत त्यांना विशेष प्रवर्ग बनवून आरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली आहे. नसीम खान म्हणाले की, आघाडी सरकारने मुस्लिम समाजातील ५२ मागास जातींना आरक्षण देऊ केले होते. या जातींना पुन्हा एकदा पाच टक्के आरक्षण लागू करा, या मागणीचा पुर्नउच्चार त्यांनी केला.

तिसर्‍या दिवशीही मराठा, धनगर आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -