घरभक्तीमंदिरात मूर्तींना स्पर्श करण्यास का मनाई असते?

मंदिरात मूर्तींना स्पर्श करण्यास का मनाई असते?

Subscribe

मंदिरात प्रवेश करताना आपण बऱ्याच वेळा पाहतो की, तेळी मुर्त्यांना स्पर्श करु नये. परंतु असे नक्की का लिहिलेले असेल याचा विचार तुम्ही कधी केलायं का? तर जाणून घेऊयात याच संबंधित नियम काय आहेत आणि असे करण्यास का मनाई असते त्याबद्दल अधिक.

मंदिरात प्रवेश करताना आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते. जसे की, संपूर्ण शरिर झाकेल असे कपडे घालणे, पायातील चप्पल बाहेर काढून येणे. तसेच प्रवेश करताना पायऱ्यांना स्पर्श आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथील मुर्त्यांना स्पर्श न करणे असे सुचना फलक लिहिलेले असतात.

- Advertisement -

कारण मंदिरातील प्रत्येक मुर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर त्यांची पूजा ही केलेली असते. अशातच जर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतक मुर्तींना स्पर्श केल्यास तर त्यांचे पावित्र्य कमी होऊ शकते. असे ही होऊ शकते की, मंदिरात प्रवेश करताना एका भक्ताने शुद्ध मनाने येईलच असे नाही. त्यामुळेच पुजाऱ्यांद्वारे मुर्तींना स्पर्श करण्यास मनाई केली जाते.

- Advertisement -

हिंदू धर्मात कोणतेही कर्मकांड करण्यापूर्वी शुद्ध होणे फार महत्वाचे मानले जाते. जर मंदिरात पूजेसाठी प्रवेश करणार असाल तर तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही ही पवित्र असणे आवश्यक असावे. मंदिराच्या आतामध्ये अशा काही मुर्ती असतात ज्यांना आपण स्पर्श करतो ज्यांच्यावर चंदन लावले जात नाही. अशा मुर्त्यांना स्पर्श करु नये.

पहाटेच्यावेळी सर्व मुर्त्यांचे श्रृगांर केले जाते. अशातच तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास त्यांचा श्रृंगार बिघडू शकतो. या व्यतिरिक्त काही मंदिरांच्या गाभाऱ्यात जाण्यास भाविकांना परवानगी नसते. केवळ पूजारीच तेथे जाऊ शकतात. मुर्त्या या नेहमीच गाभाऱ्यात असतात त्यामुळे त्यांना कोणाताही व्यक्ती अगदी सहज जाऊन स्पर्श करु शकत नाहीत. त्यांचे एक पावित्र्य असते.

मंदिरांतील मुर्त्यांना स्पर्श करण्यास भले मनाई असते पण तुम्ही निश्चित वेळी शिवलिंगाला स्पर्श करु शकता. शिवलिंगाला स्नान आणि श्रृंगाराची वेळ पहाटे ६ ते ११ पर्यंत मानली जाते.

 


हेही वाचा: त्या घटनेनंतर या देवीच्या मंदिरात नतमस्तक होऊन औरंगजेबने मागितली होती माफी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -