घरभक्तीपौष पौर्णिमेला सूर्य-चंद्राचे खास महत्त्व; जाणून घ्या 3 अद्भुत संयोग

पौष पौर्णिमेला सूर्य-चंद्राचे खास महत्त्व; जाणून घ्या 3 अद्भुत संयोग

Subscribe

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्व आहे. पौष महिन्यातील पौर्णिमेला पौष पौर्णिमा म्हटलं जातं. येत्या 6 जानेवारी 2023 रोजी वर्षातील पहिली पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी श्री नारायणांसोबत देवी लक्ष्मी आणि चंद्राची देखील पूजा-उपासना केली जाते. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायणांची पूजा-उपासना केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण कथेचे पठण केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते.

या व्यतिरिक्त पौष पौर्णिमेचे आणखी एक महत्त्व आहे. कारण, या दिवशी सूर्याची आणि चंद्राची पूजा करण्याचे महत्त्व आहे. खरंतर, पौष महिना सूर्य देवांना समर्पित केला जातो. तसेच पौर्णिमेला चंद्राचे महत्त्व असते. सूर्य आण चंद्राचा या दुर्लभ संयोग केवळ पौष पौर्णिमेच्या दिवशीच पाहायला मिळतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्व सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर या व्रताची सुरुवात होते आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन व्रताची समाप्ती होते.

- Advertisement -

या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने आणि त्याची उपासना केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. तसेच या दिवशी चंद्राची पूजा केल्याने मानसिक आजारांपासून सुटका होते. तसेच या दिवशी स्नान-दान करण्याचे देखील महत्त्व आहे.

- Advertisement -

पौष पौर्णिमा शुभ मुहूर्त
ज्योतिष पंचांगानुसार पौष महिन्याच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात 6 जानेवारी पहाटे 2 : 14 पासून 7 जानेवारी पहाटे 4 : 37 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे पौर्णिमेचे व्रत 6 जानेवारी 2023 रोजी केले जाईल.

पौष पौर्णिमेचे 3 शुभ योग

  • इंद्र योग- 06 जानेवारी 2023, सकाळी 08 : 11 मिनटांपासून ते 07 जानेवारी 2023, सकाळी 08 : 55 पर्यंत असेल.
  • ब्रह्म योग- 05 जानेवारी 2023, सकाळी 07 : 34 मिनट ते 06 जानेवारी 2023, सकाळी 08 : 11 पर्यंत असेल.
  • सर्वार्थ सिद्धि योग- 06 जानेवारी 2023, सकाळी 12 :14 मिनटांपासून ते 7 जानेवारी, सकाळी 06:38 पर्यंत असेल.

हेही वाचा :

वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला बनतायत 3 अद्भुत संयोग; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -