घरठाणेशहापूर तालुक्यात १६ वीज चोरांविरुद्ध कारवाई

शहापूर तालुक्यात १६ वीज चोरांविरुद्ध कारवाई

Subscribe

शहापूर तालुक्यात वीज चोरांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत गेल्या दोन दिवसात १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास पाच लाख रुपयांची ३० हजार युनिटची वीज चोरी पकडण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. शहापूर उपविभागातील कलंभा, निर्मलनगर, लाहे, कसारा या परिसरातील वीज पुरवठ्याची गेल्या दोन दिवसात तपासणी करण्यात आली. या तपासणीत १६ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले.

वीज चोरट्यांनी अंदाजे पाच लाख रुपयांच्या ३० हजार युनिट विजेचा चोरटा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तर ४ डिसेंबरला लेनाड गावात केलेल्या तपासणीत समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराकडून तीन ठिकाणी विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी सहा हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध पथकाकडून कारवाई करण्यात आली. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तालुक्यातील धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव आणि परिसरातील गावांमध्ये पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून यानंतरही वीज चोरीविरुद्ध मोहीम सुरुच राहणार आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत वीज चोरट्यांकडून आतापर्यंत चोरीच्या विजेचे सुमारे ८६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. वीज कायदा-२००३चे कलम १३५ आणि १२६ नुसार वीज चोरट्यांना तीन वर्षांपर्यंतचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद असून वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता चेतन वाघ, सहाय्यक लेखापाल विशाल सानप, सहाय्यक अभियंता विश्वजित खैतापुरकर, कनिष्ठ अभियंता त्रंबक कदम तसेच २० कर्मचारी आणि २ सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.


हेही वाचा – ठाणेकरांनो, सावधान! शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -