घरताज्या घडामोडी३० वर्षांनंतर शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार; 'या' ४ राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये...

३० वर्षांनंतर शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार; ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचा योग

Subscribe

राशीत होणारा शनिचा बदल हा ज्योतिष शास्रांनुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. २०२२मध्ये शनि आपल्या राशीत बदल करणार आहे. शनि राशीत बदल करताच काही राशीतील व्यक्तींवर शनिच सावट असेल तर काही राशीतील व्यक्तींना खूप लाभदायक ठरणार आहे. सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. २९ एप्रिल २०२२ पासून शनि कुंभ राशीत भ्रमण करेल. या बदलामुळे कोणत्या ४ राशीच्या व्यक्तींना लाभ होण्याची शक्यता आहे? ते जाणून घ्या

मेष – या राशीतील व्यक्तींना कुंभतील शनिचे भ्रमण लाभदायक असेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. वेतनात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. मेहनतीचे चांगले फळ प्राप्त होईल. तसेच नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या राशीतील जो व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहे, त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हवी असलेली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्तीची प्रतिमा समजात चांगली होईल. एकूणच नोकरदारांसाठी हा काळ शुभ असणार आहे.

- Advertisement -

सिंह – शनिच्या बदलामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. लाभ होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची पूर्णपणे साथ मिळेल. नोकरीत उत्तम प्रगती होण्याचे चिन्ह आहेत. पगारात वाढ होऊ शकते.

कन्या – या राशीतील लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच चांगली बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. पैसे जमा करण्यात यश मिळेल. जुने कर्ज फेडता येईल. नोकरदारांना लाभ होईल आणि प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोर जाल.

- Advertisement -

धनु – या राशीतील लोकांचे उत्पन्न वाढू शकते. पैशांची बचत करण्यात यश मिळेल आणि गुंतवणूक केल्याने नफा मिळेल. चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. कामानिमित्ताने केलेल्या प्रवासातून पैशाचा लाभ होईल.


हेही वाचा – राशीभविष्यः गुरुवार ०२ डिसेंबर २०२१


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -