घरताज्या घडामोडी...तर पाकची ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती

…तर पाकची ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती

Subscribe

हवाईदल प्रमुख धनोआ यांची माहिती

भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने मुक्त केले, असा खुलासा स्वत: पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. पाकिस्तानच्या संसदेतच ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हा खुलासा केला आहे. यावर भारताचे तत्कालीन वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावेळी भारतीय सैन्य खूप अ‍ॅग्रेसिव्ह होते. आम्ही त्यावेळी अशा स्थितीत होतो की पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नसते तर आम्ही त्यांची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती. ही बाब पाकिस्तानही जाणून होता, असे धनोआ म्हणाले.

माजी वायूसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांसोबत काम केले आहे. अभिनंदनच्या वडिलांना मी वचन दिले होते, की आम्ही त्याला परत आणू, असे धनोआ यांनी सांगितले. 1999 मध्ये पाकिस्तानने भारताला धोका दिला होता. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच सतर्क होतो, असेही धनोआ म्हणाले.

- Advertisement -

हल्ल्याच्या भीतीनेच अभिनंदन यांची सुटका
‘विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणार्‍या भीतीपोटी सोडण्यात आले. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तात्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आले’, अशी कबुलीच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानी संसदेत दिली आहे.

पाक लष्करप्रमुखांना फुटला घाम
पाकिस्तानमधील खासदार अयाज सादिक यांनी तर पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची झालेली हालत बोलून दाखवली. त्यावेळी पाकिस्तानी सरकारच्या मनात भारत हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती होती. भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचे तत्कालीन सेनाप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. अभिनंदन यांना सोडले नाहीतर रात्री नऊ वाजता मोदी हल्ला करील, असे बाजवा सांगत होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता, अशा शब्दात अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या मनातील त्यावेळची भीती बोलून दाखवली.

- Advertisement -

पुलवामा हे पाकिस्तानी सरकारचे कृत्य
पुलवामामधला हल्ला हे पाकिस्तानी इम्रान खान सरकारचं कृत्य आहे अशी कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी त्यांच्या संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष PTI आणि इम्रान खान यांना दिलं आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतातील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले होते. फवाद चौधरी यांनी आता पुलवामा हल्ला हे त्यांच्या पक्षाचं आणि इम्रान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -