कार भाड्याने देणे पडलं महागात! पुण्यात ३०० कारमालकांची फसवणूक

सध्याच्या काळात कोण कोणाची कशी फसवणूक करेल काही सांगता येत नाही

car owners cheated by car rent mortagaged fraud in pune
कार भाड्याने देणे पडलं महागात! पुण्यात ३०० कारमालकांची फसवणूक

आयटी पार्कमध्ये गाडी लावा आणि महिन्याला घरबल्या पैसे कमवा.अशी भन्नाट ऑफर देऊन अनेक कार मालकांची फसवणूक करण्यात आलीय. पुण्यातील हा धक्कादायक प्रकर आहे.  आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने द्या आणि घरबल्या पैसे कमवा असं आमिष दाखवून चक्क एका सरपंचाने तब्बल पुण्यातील एकूण ३०० कारमालकांची फसवणूक केलीय. सध्याच्या काळात कोण कोणाची कशी फसवणूक करेल काही सांगता येत नाही,हे पुन्हा एकदा पहायला मिळाले.

पुण्याच्या आयटी पार्कमध्ये आपली चारचाकी गाडी भाड्याने द्या आणि महिन्याला तब्बल २५ हजार रुपये कमवा अशी ऑफर देण्यात आली.  राजगुरुनगर येथील अमोल भागडे या माजी सरपंचाला अनेकांनी आपल्या गाड्या भाड्याने दिल्या. आपल्याच गाड्या भाड्याने देऊन त्याचे भाडे मिळणार त्यामुळे अनेकांनी तब्बल ४ -४ गाड्या विकत घेतल्या. अनेकांनी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलं.

लोकांचा आपल्यावर विश्वास बसलाय हे लक्षात आल्यावर अमोलने त्यांचा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी सुरुवातीच्या काळात वेळोवेळी भाडी दिली. मात्र पुढे ही भाडी मिळण बंद झाली. भाडी मागितल्यानंतर उडावा उडवीची उत्तरे देण्यात आली.  खरंतर ज्यांनी आपल्या गाड्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. त्यांना देखील आपली गाडी प्रत्यक्षात कुठे जाणार हे माहिती नव्हतं. कार मालकांना भाडे मिळणे बंद झाल्यावर आपली फसवणूक होतेय का अशी शंका त्यांच्या मनात आली आणि ऐन दिवाळीत आपल्या भाडेतत्त्वावर दिलेल्या गाड्यांचे काय झाले असावे? असा प्रश्न त्यांना पडला. कार मालकांनी याची पोलिसात तक्रार दाखल केली आणि तपासाअंती भाडेतत्त्वावर गाड्या घेतलेल्या अमोल भागडे या आरोपीने या गाड्या परस्पर विकल्याचे समोर आले. खेड तालुक्यातून ५५ वाहनांच्या तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्यात तर पुणे जिल्ह्यातून ३००हून अधिक गाडी मालकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

खेड पोलिसांकडे इतके गुन्हे दाखल झाल्यानंतर GPS च्या माध्यमातून या गाड्यांचा शोध सुरू केला. यातील २० गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यात आणखी मोठी वाहने देखील असू शकतील असा पोलिसांचा अंदाज आहे. या गाड्यांमध्ये प्रामुख्याने इनोव्हा, इको, हुंडाई, अर्टिगा सारख्या गाड्या त्याचप्रमाणे जीपचा समावेश आहे. सध्या पुण्यात या आयटी पार्कच्या भाड्याच्या गाड्यांची एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुणेकरांनो सावधान आपली गाडी कोणालाही भाडेतत्त्वावर देताना १० वेळा विचार करा.


हेही वाचा – तुरुंगातून बाहेर येताच दिराने केला भावजयीचा खून