घरताज्या घडामोडीAlibaug : रेवस बंदरावर रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम वेगाने सुरू

Alibaug : रेवस बंदरावर रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम वेगाने सुरू

Subscribe

अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांना रेवस बंदर हा पर्याय आहे.

अलिबाग तालुक्यातील सर्वात जुन्या रेवस बंदरातून वर्षाच्या बारमाही प्रवासी वाहतूक करणार्‍या रेवस-करंजा या जलप्रवासात २०२२ च्या शेवटी रो-रोची सुविधा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रवासी सेवेसाठी अतिरिक्त सक्षम जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे.रेवस हे प्रवासी बंदर १९०४ च्या सुमारास उभारण्यात आले. या ब्रिटिशकालीन बंदरातून रेवस-मुंबई असा जलप्रवास आजही सुरू आहे. १९४७ नंतर या बंदराचे नूतनिकरण आणि विस्तारीकरण झाले. याच बंदरातून रेवस ते करंजा प्रवासी वाहतूक सुरू असते. या जलवाहतुकीला देखील कित्येक वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे ही जलवाहतूक बाराही महिने सुरू असते. पावसाळ्यात हवामान खराब झाल्यास ती तात्पुरती बंद ठेवण्यात येते, अन्यथा दररोज शेकडो प्रवासी या तर सेवेला प्राधान्य देतात. उरण, पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथे दैनंदिन प्रवास करणारे चाकरमानी, किरकोळ भाजी विक्रेते याच सेवेचा लाभ घेतात. जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत रेवस-मुंबई बोट सेवा बंद राहते. त्यामुळे मुंबईत जाणारे प्रवासी कमी खर्चाचा आणि वेळेच्या बचतीचा मार्ग म्हणून रेवस-करंजा तर सेवेला प्राधान्य देतात. या तर सेवेतून प्रवाशांबरोबर वाहनांची देखील ने-आण केली जाते.अलिबागकडे येणार्‍या पर्यटकांना रेवस बंदर हा पर्याय आहे. मांडवा बंदरातील रो-रो प्रवासी वाहतूक सेवेप्रमाणे रेवस-करंजा या मार्गावर सुद्धा रो-रो सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे. करंजा बंदरावर रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधून तयार आहे. त्याप्रमाणे रेवस बंदरावर सुद्धा रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेवस-करंजा हा रस्ता मार्ग जवळपास ८० किलोमीटरचा आहे. परंतु त्याचा जलमार्ग हा अवघा ३ किलोमीटर (११९६ मीटर लांबीचा) आहे. रेवस बंदरावरील रो-रो सेवेचे काम एमईसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून केले जात आहे. तर या प्रकल्पाला २५ कोटी सात लाख १० हजार रुपयांची मान्यता आहे. टेंडर २१ कोटी ६५ लाखाचे आहे. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के खर्च केला जाणार आहे. दरम्यान, नवखार गाव ते रेवस बंदरपर्यंतचा रस्ता कायमच खड्ड्यात गेलेला असतो. आता रेवस-करंजा रो-रो सेवेच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. रो-रो प्रकल्पामुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढणार आहे.

- Advertisement -

                                                                                        वार्ताहर :- रत्नाकर पाटील


हे ही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यनची आजची रात्र तुरुंगात; जामीनावर उद्या सुनावणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -