घरCORONA UPDATECorona Live Update: २४ तासांत ९०७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Corona Live Update: २४ तासांत ९०७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Subscribe

२४ तासांत ९०७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

- Advertisement -

राज्यात १२,६०८ नव्या रुग्णांची नोंद, ३६४ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासहीत त्यांच्या परिवारातील तब्बल १२ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवनीत कौर राणा यांच्यावर नागपूर येथील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पतीला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात १४७ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ११ हजार ९२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२४ पोलिसांचा मृत्यू झाला असून ९ हजार ५६९ पोलीस रिकव्हर झाले आहेत. तसेच सध्या २ हजार २२७ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाने दिली आहे.


देशात १३ ऑगस्टपर्यंत २ कोटी ७६ लाख ९४ हजार ४१६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ८ लाख ४८ हजार ७२८ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहे, अशी माहिती आसीएमआरने दिली आहे.


देशात २४ तासांत ६४ हजार ५५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनोबाधितांची संख्या २४ लाख ६१ हजार १९१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४८ हजार ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून १७ लाख ५१ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच देशात सध्या ६ लाख ६१ हजार ५९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात २ कोटी १० लाख ७९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ लाख ५३ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले असून १ कोटी ३९ लाख ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गुरुवारी दिवसभरात ११ हजार ८१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी राज्यात ९ हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -