घरताज्या घडामोडीDiwali 2021: देशभरात दिवाळीचा उत्साह! जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि...

Diwali 2021: देशभरात दिवाळीचा उत्साह! जाणून घ्या नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

Subscribe

नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचे प्रतिक म्हणून कारेटे फोडण्याची प्रथा

देशभरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशातच नाही परदेशातही दिवाळी सण साजरा केला जातं आहे. सोमवारी झालेली धनोत्रयोदशी देखील मोठ्या उत्साहात पार पडली. उद्या म्हणजेच बुधवारी खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होईल. दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हणतात. या दिवशी अकाली मृत्यू होण्याचा धोका टळतो असे म्हटले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांने नरकासुर राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला. वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींनी विजय मिळवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचे प्रतिक म्हणून कारेटे फोडण्याची प्रथा आहे. आपल्या अंगी असलेले सर्व वाईट गुण आपल्या पायदळी तुडवून नवी सुरुवात करणे हा या मागचा हेतू आहे.

दिवाळीच्या दिवशी उडणे लावून अभ्यंगस्नाग केले जाते. पहाटे उठून दारात रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. यंदा हिंदू पंचांगानुसार उद्या म्हणजेच गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस म्हणजे दिवाळी. काय आहे दिवाळीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

- Advertisement -

दिवाळीचा शुभ मुहूर्त

४ नोव्हेंबर २०२१

अमावस्या प्रारंभ – ४ नोव्हेंबर सकाळी ६:०३ वाजता
अमावस्या समाप्ती – ५ नोव्हेंबर दुपारी २:४४ वाजता

- Advertisement -

दिवाळी नंतरचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन दिवाळीचा सण खरंतर लक्ष्मीला समर्पित आहे. ज्या लोकांना पैशांची कमतरता आहे त्यांच्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस असतो. या दिवसी घरातील सोनो नाणे,पैशांची पूजा केली जाते. यंदाचे लक्ष्मी पूजन ५ सप्टेंबर रोजी आले आहे.

लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त

५ नोव्हेंबर २०२१

संध्याकाली ६:०९ ते रात्री ८:२० वाजेपर्यंत
प्रदोष काळ – १७:३४ ते २०:१० वाजेपर्यंत
वृषभ काळ – १८:१० ते २०:०६ वाजेपर्यंत

लक्ष्मी साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत

देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी मातेची पूजा सारखीच असते मात्र लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. लक्ष्मी पूजनच्या वेळी ऊस, कमळ,नागकेसर,आवळा,खीर प्रसाद म्हणून वाटला जातो. त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीला खुश करण्यासाठी मंदिरात पूजा केली जाते. धूप,कापूर,कमळाचे फूल,गुलाबी कापड दाखवले जाते. असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी तिजोरीत नागकेसर किंवा कमळ लाल कपड्यात बांधून ठेवल्यास आपल्याकडची संपत्ती वाढते. अनेक ठिकाणी नवविवाहीत जोडप्यांनी घरी बोलावून त्यांना गोडचे अन्न खाऊ घातले जाते तसेच त्यांना लाल रंगाची वस्त्र भेट म्हणून दिली जातात.


हेही वाचा – दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून राहा सावधान

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -