घरताज्या घडामोडीदक्षिण आफ्रिकेतून आले महिलांच्या गाऊनमधून ड्रग्ज

दक्षिण आफ्रिकेतून आले महिलांच्या गाऊनमधून ड्रग्ज

Subscribe

शहरासह राज्यातील महत्वाच्या शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. स्थानिक अंमली पदार्थ विरोधी पथक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पाठोपाठ ‘डीआयआर’ने ड्रग्स माफियावर लक्ष केंद्रित केले आहे. डीआयआरने नुकतेच ‘ऑपरेशन क्रुगर’ अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतून आलेले ‘हेरॉईन’ हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. हे हेरॉईन महिलांच्या गाऊनच्या विशिष्ट प्रकारच्या बटनांमध्ये लपवून आणण्यात आले होते. ही कारवाई मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली असून याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

डीआयआरच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ऑपरेशन क्रुगर’ ड्रग्स माफिया विरोधात वापरण्यात आलेली मोहीम आहे. मागील ७ दिवसात ऑपरेशन क्रुगरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे.

- Advertisement -

महिलांच्या गाऊनच्या बटन्समध्ये ड्रग्स
दक्षिण आफ्रिकेतून एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीमार्फत मुंबईत आलेल्या महिलाचे गाऊनचे पार्सलबाबत संशय आल्याने डीआयआरच्या अधिकार्‍यांनी हे पार्सल तपासले असता महिलांच्या गाऊनला एक विशिष्ट प्रकारचे कापडी कपड्याने सील बटन्स लावलेले दिसून आले. डीआयआरच्या अधिकार्‍यांनी गाऊनचे बटन उघडून बघितले असता बटनात पांढर्‍या रंगाची पावडर मिळून आली. या बटन्समध्ये मिळून आलेली पांढर्‍या रंगाची पावडर तपासली असता हेरॉईन हा सर्वात महागडा अंमली पदार्थ असल्याचे समोर आले. अधिकार्‍यांनी पार्सल आलेले सर्व गाऊनचे बटन्स तपासले असता त्यात सुमारे ३९६ ग्रॅम हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३०कोटी एवढी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याप्रकरणी डीआयआरने एका नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -