घरक्राइमबायकोला नातेवाईकासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि...

बायकोला नातेवाईकासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि…

Subscribe

बायकोला नातेवाईकासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडणाऱ्या नवऱ्यांनी केली पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या.

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून दोघांनाही जागीच ठार केले आहे. दिलीप तानाजी ठाकरे, असे आरोपीचे नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत संगिता ठाकरे आणि पांडू बाळकृष्ण श्रावण या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी माहिम येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पालघर तालुक्यातील सफाळे कपासे ठाकूरपाडा याठिकाणी दिलीप तानाजी ठाकरे राहतात. तर त्यांची पत्नी संगीता ठाकरे यांचे नातेवाईक पांडू श्रावण यांच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, नातेवाईक असल्याच्या बहाण्याने दोघेही एकमेकांच्या घरी ये-जा करत होते. मात्र, आपल्या पत्नीचे नातेवाईक असल्याने सर्वप्रथम पतीला बायकोवर कोणताही संशय आला नाही. दरम्यान, एकदिवस दिलीप घरात नसल्याची संधी साधत पांडू घरी आला. त्याच दरम्यान दिलीप घरी परतला. दार उघडताच त्यांनी बायकोला आणि तिचा प्रियकर पांडूला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. ते पाहताच दिलीपला राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात घरात असलेल्या कुऱ्हाडीचा दांडा दोघांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – हळदी-कुंकू कार्यक्रमाला गेली; घरी परतली आणि…


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -