घरताज्या घडामोडीश्रीवर्धन नगर परिषदेच्या मनमानी विरोधात किरीट सोमय्यांना साकडे

श्रीवर्धन नगर परिषदेच्या मनमानी विरोधात किरीट सोमय्यांना साकडे

Subscribe

वेगवेगळ्या तक्रारींचे निवेदन सोमय्या यांना देण्यात आले आहे.

श्रीवर्धन येथील नगर परिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना साकडे घालण्यात येऊन न्याय मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. धनिकांसाठी नगर परिषदेने वेगळे नियम केलेले असून, ३ मजली इमारत असलेल्या धनाढ्यांकडून फक्त पहिल्या मजल्याची घरपट्टी आकारली जाते. यातून सर्व्हे चुकीचा झाल्याचे निष्पन्न होते. काही धनिकांकडून घरपट्टी कमी आकारली जाते. चतुर्थ वाढीप्रमाणे घरपट्टी वाढते की कमी होते, असा सवाल करतानाच नगर परिषद केवळ धनिकांचे हित पाहत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आदेश पाटील यांनी केला आहे.

मानवाधिकारचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश करडे आणि पाटील यांनी वेळोवेळी नगर परिषदेकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत पुरावे जमा करून सुद्धा काही निष्पन्न होत नसल्यामुळे करडे १९ मार्च २०२० रोजी बेमुदत उपोषणास बसणार होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि निर्बंध लक्षात घेता उपोषण स्थगित करण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२० रोजी अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा या हेतूने स्मरणपत्र नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले. परंतु करडे यांच्या म्हणण्यानुसार स्मरणपत्राला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

नगर परिषदेकडून जन्म-मृत्यू दाखल्याचे १०० रुपये आकारले जातात. तर महाड नगर परिषदेकडून ३० आणि मुरुड नगर परिषदेकडून केवळ १० रुपये आकारले जातात. याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. पाणीपट्टी चुकीच्या पद्धतीने आकारली जाते. तसेच घनकचरा प्रकल्पामधे खताची निर्मिती न करता नोंदीमधे खताची निर्मिती दाखवून विक्रीच्या खोट्या नोंदी दाखवल्या गेल्या आहेत. या वेगवेगळ्या तक्रारींचे निवेदन सोमय्या यांना देण्यात आले आहे. त्यामुळे ते आता कोणती पावल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हे ही वाचा – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एका पंचाची ओळख उघड; नवाब मलिकांविरुद्ध पोलिसात तक्रार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -