घरताज्या घडामोडीकाशीद समुद्रात बुडणाऱ्याला जीवरक्षकांकडून जीवनदान

काशीद समुद्रात बुडणाऱ्याला जीवरक्षकांकडून जीवनदान

Subscribe

जीवरक्षक राकेश रक्ते याच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.

महाराष्ट्राचा ‘मिनी गोवा’ म्हणून कायम चर्चेत असणारा काशीद समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तर मुंबई, पुणेकर पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ असल्याने विकेंडला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या काशीद समुद्रकिनारी चिंचवड, पुणे येथे राहणारा तरुण सलीम शेख आणि त्याचे काही नातेवाईक फिरण्यासाठी आले होते. त्यांना काशीद समुद्र किनारी मौजमजा करीत असताना समुद्रात पोहायचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने सलीम शेख पाण्यात दूरवर गेला आणि पाण्यात बुडाला. मात्र तेथील जीवरक्षकाने सलीमचा जीव वाचवला. ही घटना आज २६ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

समुद्र किनारी येण्यासाठी सलीम शेख हा प्रयत्न करीत होता, मात्र तो समुद्रात खेचला जात होता. त्याला वाचविण्यासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटकांना विनवणी केली.त्यावेळी काशिद बीचवरील जीवरक्षक राकेश रक्ते याने, तत्परतेने  खोल समुद्रात पोहत जाऊन पाण्यात बुडत असणाऱ्या सलिम शेख या तरूणाला सुखरूपरित्या बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. जीवरक्षक राकेश रक्ते याच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे. याशिवाय सलीम शेख यानेही जीवरक्षक राकेश तक्ते याचे आभार मानले.

- Advertisement -

                                                                                                     -अमूलकुमार जैन


हे ही वाचा – भारताकडून गुन्हेगारासारखी वागणूक- अफगाणि महिला खासदाराचा आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -