घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण कोरोनामुक्त

Live Update: मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून १ हजार ६५७ नवीन रुग्ण सापडले तर २ हजार ५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईत गेल्या २४ तासांत ६२ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर १९९ दिवसांवर वर गेला आहे.

- Advertisement -

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आज (दि.१४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

- Advertisement -

१६ ते ३१ दरम्यान केंद्र सरकार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जवळपास १ कोटी ९२ लाख लसींचा नि:शुक्ल पुरवठा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.


भारतात स्पुतनिक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.  कस्टम फॉर्मा सर्व्हिसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांनी हैद्राबदमध्ये स्पुटनिक लसीचा पहिला डोस घेतला. भारतात स्पुटनिक लस घेणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.


मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल हेदेखील हजर, लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांची हजेरी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई हायकोर्टात दाखल झाले आहेत.  त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी मुख्यमंत्र्यांसोबत हायकोर्टात दाखल झाले आहेत.


पंतप्रधान मोदींचा देशातील शेतकऱ्यांशी संवाद


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्सफन्सिंगद्वारे देशातील ९.५ करोड शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे.


मुंबईत पेट्रोलचे दर ९८.६५ रुपये इतके झाले आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी मुंबईत आज ९०.११ रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ९२.३४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत पेट्रोलचे दर ८२.९८ रुपये इतके आहेत.


देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ लाख ४३ हजार १४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात २४ तासात ४ हजार रुग्ण दगावले आहेत.


ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात कोरोना लसीचे २१६ कोटी डोस तयार केले जाणार असल्याचे केंद्र सरकार सांगण्यात आले आहे.


गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोनाची मोठी सुविधा केली आहे. तरीही गुरुवारी गोव्यात २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १५हून अधिक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -