घरताज्या घडामोडीLive Update: लखीमपुर खीरी प्रकरण, आशिष मिश्राची १० तासांपासून चौकशी

Live Update: लखीमपुर खीरी प्रकरण, आशिष मिश्राची १० तासांपासून चौकशी

Subscribe

लखीमपुर खीरी मधील शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. आशिष मिश्राची मागील १० तासांपासून चौकशी सुरु आहे. एसआयटी पथकाने आशिष मिश्राला ४० हून अधिक प्रश्न विचारले असल्याची माहिती मिळाली आहे. आशिष मिश्राला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.


ज्या लोकांना एनसीबीने सोडलं आहे त्यांच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा निकटवर्तीय (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शिवसेना ताकदीने उतरणार आहे. मविआ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे – संजय राऊत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकाल उपस्थित आहेत.

- Advertisement -

चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या ठिकाणी उपस्थित आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. नारायण राणे यांच्यासोबत नितेश राणे आणि निलेश राणे देखील विमानतळावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. राणे आणि उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.


 

एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे फर्जीवाडा आहे. आर्यन खानचा पंचनामा कॉम्युटरवर टाईप केला, मूनमूनचा पंचनामा हस्तलिखीत होता. पुढचे टार्गेट शाहरुख खान होता अशी बातमी पेरण्याचा प्रयत्न होता. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. बड्या आसामींच्या मुलांना बोलावून गोवण्यात आले – नवाब मलिक


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्या वेळाच सिंधुदूर्ग चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,बाळासाहेब थोरात देखील उपस्थित आहेत.


 

शुक्रवारी रात्री मुंबईला येणाऱ्या लखनऊ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी ते कसारा प्रवासादरम्यान ८ जणांनी एका तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


चिपी विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मुंबईहून रवाना झाले आहेत. सकाळी 11.00 वा.​विमानाने चिपी विमानतळ, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदूर्गकडे प्रस्तान केले. दुपारी 12.15 वाजता मुख्यमंत्री चिपी विमानतळावर दाखल होतील.  दुपारी 1.00 वा.​ ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदूर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे.


 

देशात गेल्या २४ तासात १९,७४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


आज चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.चिपी विमानतळाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -