घरताज्या घडामोडीतिरंग्याच्या अपमानानं देश दु:खी, दिल्ली हिंसेवर मोदींची 'मन की बात'

तिरंग्याच्या अपमानानं देश दु:खी, दिल्ली हिंसेवर मोदींची ‘मन की बात’

Subscribe

देशातील कोरोना लसीकरण जगासाठी बनत आहे उदाहरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. २६ जानेवारीला दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेने आणि तिरंग्याच्या अपमानामुळे देश दुःखी झाला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या संभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्प सत्राला सुरुवात झाली आहे. तसेच या दरम्यान पद्म पुरस्करांचीही घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी पुरस्कारांच्या यादीत त्या व्यक्तींची नावे आहेत. ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या कामगिरीमुळे इतरांचे जीवन बदलले आहे तसेच देशाचे हित साधले आहे.

तिरंग्याच्या अपमान झाल्याने देश दुःखी

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेट मैदानातूनही चांगली बातमी समोर आली आहे. सुरुवातीच्या खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूंची मेहनत प्ररणा देणारी आहे.

- Advertisement -

कोरोना लसीकरण जगासाठी उदाहरण

नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाशी सुरु असलेल्या लढाईलाही एक वर्ष पुर्ण झाले आहे. परंतु कोरोनावर भारताने केलेली मात ही जगासाठी एक उदाहरण बनली आहे. तसेच आपली कोरोना लसीकरण मोहिमही जगासाठी उत्तम उदाहरण झाली आहे. देशात कमी वेळात जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. ही आपल्यासाठी गर्वाची बातमी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषध पुरवठा केला. भारत औषध पुरवठा ह्यासाठी करत आहे कारण औषध आणि लसीच्या उत्पादनात भारत सक्षम झाला आहे.

मोदींचे तरुणांना आवाहन

देश यावर्षापासून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा अमृतमहोत्सव सुरु करत आहे. भारताच्या प्रत्येक भागात प्रत्येक शहरात आणि गावखेड्यांत स्वातंत्र्याची लढाई पूर्ण ताकदीनीशी लढली आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा महान सुपुत्रांनी आणि वीरांगणांनी जन्म घेतला. ज्यांनी आपले संपुर्ण जीवन राष्ट्रासाठी वाहिले आहे. त्यामुळे अशा महान लोकांच्या आणि आठवणी आणि संघर्ष जतन केला पाहिजे. त्यांच्याबाबत लिहून आपण आपल्या भावी पिढीसाठी ठेवू शकतो. असे आवाहन मोदींनी तरुणांना केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -