घरताज्या घडामोडीनिफाड, येवला, चांदवड ठरणार दिंडोरी मतदारसंघाचे गेमचेंजर

निफाड, येवला, चांदवड ठरणार दिंडोरी मतदारसंघाचे गेमचेंजर

Subscribe

दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, चांदवड, येवला या तीन तालुक्यांत सर्वाधिक मतदार संख्या असली 2019 मध्ये निफाड, येवला, दिंडोरी या तीन तालुक्यातून सर्वाधिक मतदान झाले. निफाडमध्ये 73.68, येवल्यातून 67.75 तर दिंडोरीत 65.76 टक़्के मतदान झाले. त्यामुळे हे तीन तालुके 2024 मध्ये गेमचेंजर ठरतील की नाही हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. 2019 मध्ये सतराव्या लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिंडोरीत 29 एप्रिल 2019 रोजी चौथ्या टप्प्यात 65.76 टक्के मतदान झाले. यात भारती पवारांना 5 लाख 67 हजार 470 (49.88 टक़्के) तर राष्ट्रवादीच्या धनराज महालेंना 3 लाख 68 हजार 691 (32.41 टक्के) मते मिळाली.

दिंडोरी मतदारसंघावर गेल्या चार पंचवार्षिकपासून भाजपची निर्विवाद सत्ता असल्याचे दिसून येते. 2004, 2009, 2014 या तीनही पंचवार्षिकमध्ये हरीश्चंद्र चव्हाण निवडून आले तर 2019 मध्ये भाजपतर्फे भारती पवार निवडून आल्या. यंदा भाजपने पुन्हा भारती पवारांनाच दिंडोरीतून लोकसभेचे तिकीट दिले आहे तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे भास्कर पवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

- Advertisement -

दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, कळवण (एसटी), चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी (एसटी) अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात एकूण 18 लाख 41 हजार 730 मतदार असून यात 9 लाख 54 हजार 720 मतदार पुरुष तर 8 लाख 86 हजार 993 महिला उमेदवार आहेत. तृतीय पंतीय मतदारांची संख्या 17 आहे. मतदार संख्येचा विचार करता सर्वात जास्त मतदार हे नांदगाव विधानसभा मतदारसंघात आहेत तर त्यापाठोपाठ दिंडोरी (एसटी) चा नंबर लागतो. नांदगावमध्ये 3 लाख 30 हजार 119 तर दिंडोरीत 3 लाख 19 हजार 930 मतदार आहेत. त्यानंतर येवल्यात 3 लाख 12 हजार 255, चांदवड 2 लाख 97 हजार 274, कळवणमध्ये 2 लाख 92 हजार 717 तर निफाडमध्ये 2 लाख 89 हजार 435 मतदार आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून भाजपतर्फे हरीश्चंद्र चव्हाण यांना 5 लाख 42 हजार 784 मते तर राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना 2 लाख 95 हजार 165 मते पडली. 2019 मध्ये तीन वेळा खासदार झालेल्या हरीश्चंद्र चव्हाणांना डावलून भाजपने भारती पवारांना तिकीट दिले. निवडून आल्यानंतर कोरोनात उत्कृष्ट काम केलेल्या पवारांवर विश्वास दाखवत भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -