घरताज्या घडामोडीवंचित बहुजन आघाडी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार!

वंचित बहुजन आघाडी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार!

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने बिहार विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुका प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढणार नसून प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्स अर्थात PDA सोबत या निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बिहार दौऱ्यावर होते. याच भेटीदरम्यान पीडीएसोबत वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढवण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी देखील ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

‘जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष आणि प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सचे संयोजक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्यासोबत आम्ही बिहार विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सिन्हा आणि काँग्रेसला सोबत आणण्याचा देखील इथे प्रयत्न होईल. आम्हाला विश्वास आहे की गेल्या निवडणुकांप्रमाणेच याही वेळी आम्ही एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ’, असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बिहारमध्ये ३ टप्प्यांत होणार मतदान

येत्या २८ ऑक्टोबरला बिहार निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होणार असून एकूण ३ टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ही सर्वात मोठी निवडणूक होत असून त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -