घरताज्या घडामोडीमुंबई ढगाळच; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

मुंबई ढगाळच; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा इशारा

Subscribe

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर असून, सलग तिसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी देखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली. येथील हवामान ढगाळ नोंदविण्यात येत असतानाच कमाल आणि किमान तापमानातदेखील कमालीचे चढ उतार नोंदविण्यात येत आहेत. शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात कमालीची घट नोंदविण्यात येत असून, सोमवारनंतरच मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सूर्यनारायणाचे दर्शन होणार आहे.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईमधील हवामान रविवारीदेखील ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ उतार नोंदविण्यात येतील. गेल्या तीन दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -