घरताज्या घडामोडीLive Update: टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे ८४ व्या वर्षी निधन

Live Update: टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे ८४ व्या वर्षी निधन

Subscribe

टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे 84 व्या वर्षी निधन


दिलासाजनक! राज्यात आज ४५ ,५८२ नव्या रुग्णांची नोंद, तर ५४,५३५ रुग्णांना डिस्चार्ज

- Advertisement -

राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.


‘स्पुटनिक व्ही’ लशीचे डोस भारतात दाखल, पुढील आठवड्यापासून बाजारात होणार उपलब्ध

- Advertisement -

‘स्पुटनिक व्ही’ कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.


कामकाज करताना कुणावर नाराजी धरायची नसते, मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर न सांगण्याची प्रथा – जयंत पाटील


अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने २० मे पर्यंत परमबीर सिंह यांना अटक करणार नसल्याची हमी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (सविस्तर वाचा )  


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २७ जूनला होणारी पूर्वपरीक्षा आता १० ऑक्टोबरला होणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने अनेक परीक्षा या रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता UPSC ची पूर्वपरीक्षा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. (सविस्तर वाचा )  


राज्यातील शहरांमध्ये जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ग्रामीण भागात कोरोनाची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात निर्णय झाला असून ३१ मेपर्यंत लॉकडाऊन असणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आहे. आता राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गतचे कोविड-१९ संदर्भातील कडक निर्बंध लागू राहणार आहेत. (सविस्तर वाचा )


 

लसांच्या कमी साठ्यामुळे १२ लाख लोक त्यांच्या दुसर्‍या डोसची प्रतीक्षा करीत आहेत. आम्हाला लस डोस मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकाने १ कोटी लसींसाठी उद्देश पत्र जारी केल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव छत्तीसगड सीमावर्ती जंगल असलेल्या भागात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात C60च्या जवानांना यश आले आहे. एक ते दीढ तास सुरु असलेल्या चकमकीत काही जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव येथून नक्षलवाद्यांचा शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.


देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६२ हजार ७२७ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. तर ४ हजार १२० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ३ लाख ५२ हजार १८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्य सत्रातील सेट परिक्षा २६ सप्टेंबरला होणार आहे. परिक्षेसाठी १७ मे ते १० जून दरम्यान परिक्षेचा
ऑनलाईज अर्ज भरता येईल. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची सेट परिक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाद्वारे घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गोवा मिळून १५ केंद्रांवर ही परिक्षा होणार आहे. यंदा ३६ व्या सेट परिक्षेचे नियोजन करण्यात येत आहे.


राजधानी दिल्लीत आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बसरल्या आहेत.


मुस्लिम लोकांचा पवित्र सण म्हणजेच रमजान ईन शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. चंद्रदर्शन घडत नसल्याने धर्मगुरुंचा हा निर्यण आहे. पारंपरिक पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी ईद साजरी करण्यात येणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -