घरCORONA UPDATEशेवटच्या क्षणीही आईला आनंद देण्यासाठी मुलाने व्हिडिओ कॉलवर गायले गाणे, डॉक्टरही झाले...

शेवटच्या क्षणीही आईला आनंद देण्यासाठी मुलाने व्हिडिओ कॉलवर गायले गाणे, डॉक्टरही झाले भावूक

Subscribe

तो आपल्या आईकडे बघू 'तेरा मुझसे हे पहले का नाता कोई' हे गाणे गात होता.

कोरोना महामारित अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. रोज हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. नातेवाईकांप्रमाणेच डॉक्टरही रोज अनेक मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. बऱ्याच कोविड योद्धांनी आपले अनुभव सर्वासोबत शेअर केले आहेत. अनेकांच्या अनुभवातून रुग्णांना, नातेवाईकांनी नवी उमेद मिळाली आहे. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून डॉक्टर त्याच्या सोबत असतात. रुग्णाच्या शेवटच्या क्षणातही डॉक्टर त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टरची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे अनेक जण भावूक आहे. मृत्यूशंयेवर असलेल्या आपल्या आईला शेवटचे पाहण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी पोटच्या मुलाची धडपड, आईच्या शेवटच्या काळातही तिला आनंद मिळवून देणाऱ्या मुलाचा अनुभव डॉक्टरांनी शेअर केला आहे.

दीपशीखा या पेशाने डॉक्टर असून एका रुग्णालयात त्या काम करतात. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, ‘माझी शिफ्ट संपत असताना एका कोरोना रुग्णाच्या मुलाचा मला व्हिडिओ कॉल आला. त्याला त्याच्या आईशी बोलायचे होते. त्याची आई शेवटच्या टप्प्यात होती. मात्र त्याला त्याच्या आईला शेवटच्या क्षणातही आनंद द्यायचा होता. मी हातातला फोन रुग्णासमोर धरला आणि मुलाने आईसाठी एक सुंदर गाणे गायले. तो आपल्या आईकडे बघू ‘तेरा मुझसे हे पहले का नाता कोई’ हे गाणे गात होता. मी फोन हातात धरुन त्याच्याकडे बघत होती. त्याला मध्येमध्ये रडू कोसळत होते. मात्र त्याने गाणे पूर्ण केले. त्याला पाहून मलाही रडू कोसळले. त्याने त्याच्या व्हायटल्सची चौकशी केली व माझे आभार मानून फोन ठेवला’.

- Advertisement -


दीपशीखा यांनी पुढे असे लिहिले आहे की, ‘हा प्रसंग पाहून आमचे डोळे पाणावले होते. वॉर्डमध्ये शांतता होती. वॉर्डमधल्या एक एक नर्स रुग्णाकडे गेल्या. त्या गाण्याने आम्हाला पूर्ण बदलून टाकल होतो निदान मला तरी हे गाणे आता माझ्या कायम लक्षात राहिल’,असे दीपशीखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. डॉक्टर दीपशीखा यांचा हा अनुभव सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. अनेकांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर देखिल केला आहे.


हेही वाचा – covid pandemic: एका फुफ्फुसाच्या जोरावर मध्यप्रदेशातील नर्सने केली कोरोनावर मात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -