घरदेश-विदेशMucormycosis: Black fungus वर सर्वात स्वस्त आणि प्रभावी ठरतोय १०० वर्षे जुना...

Mucormycosis: Black fungus वर सर्वात स्वस्त आणि प्रभावी ठरतोय १०० वर्षे जुना फॉर्म्युला!

Subscribe

देशात एकीकडे कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजे म्युकोरमायकोसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा शरीरावर म्युकोरमायकोसिस (Mucormycosis)चे इंफेक्शन वाढत असल्याचे समोर आले आहे. जीवघेण्या म्युकोरमायकोसिसमुळे चिंता आता अधिक वाढली असताना यावर सर्वात स्वस्त आणि १०० वर्षे जुना फॉर्म्युला प्रभावी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशमच्या जबलपूरमधील एका डॉक्टराने म्युकोरमायकोसिसवर प्रभावी आणि सोपा उपचार करत असल्याचा दावा केला असून या डॉक्टराने १०० वर्षापेक्षा अधिक जुने औषध सांगितले आहे. हे औषध म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) वर अत्यंत गुणकारी, अगदी किफायशीर असल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशसह महाराष्ट्र आणि आता मुंबईतही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळल्याचे समोर येत असताना आता भोपाळ, इंदोर आणि जबलपूरमध्ये हे रुग्ण सापडल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. हा आजार जीवही घेत असल्याने प्रशासनाची झोप उडाली असून त्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी या आजारावर प्रभावी उपाय असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उपाय म्हणजे मिथलीन ब्लू असल्याचे मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी सांगितले आहे. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होते. हे औषध खाणीत काम करणाऱ्या कामगारांना तसेच गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी दिले जाते. या औषधाच्या अगदी कमी मात्रेतही रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढवता येत असून अँटी फंगसचंही काम करत आहे. घरातील फिशटँकमधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठी या औषधांचे ड्रॉप टाकले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या प्रयोगातही हे औषध प्रभावी ठरले आहे. आपल्या रुग्णालयातील १२ पेक्षा अधिक रुग्णालयांनी या औषधाचा प्रयोग सुरु केला आहे. ज्यामध्ये परिणाम चांगले दिसले असून या औषधांचे दोन डोसचं पुरेसे असून ज्याचे चांगले परिणाम असल्याचे डॉ. अमरेंद्र यांनी सांगितले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -