घरताज्या घडामोडीSolar dryer : रायगडातील बहुपयोगी 'सोलर ड्रायर' ला आंतरराष्ट्रीय पेटंट

Solar dryer : रायगडातील बहुपयोगी ‘सोलर ड्रायर’ ला आंतरराष्ट्रीय पेटंट

Subscribe

नीलेश मोनेंचा तहसीलदारांकडून गौरव

सौर ऊर्जेचे गाढे अभ्यासक आणि संशोधक नीलेश मोने यांनी बहुपयोगी सोलर ड्रायर बनविला असून, याचे पेटंट देखील त्यांनी मिळविले आहे. या मूलभूत संशोधनाबद्दल तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.मोने हे सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील रहिवासी आहेत. एका अभिनव सोलर ड्रायरच्या निर्मिती बरोबरच त्यांनी सौर पथदिवे आदिवासी भागांमध्ये बसवण्याचे काम केले आहे. सौर ऊर्जेवर ते अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. पारंपरिक ऊर्जा साधनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि ते अधिक खर्चिक असल्यामुळे सौर ऊर्जेसारख्या स्वस्त आणि प्रदूषणविरहित अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढावा यासाठी मोने अनेक वर्षे सौर ऊर्जेवर संशोधन करून त्यावर चालणारी स्वस्त आणि टिकाऊ उपकरणे बनवित आहेत. सत्काराला उत्तर देताना मोने म्हणाले की, ही कौतुकाची थाप सौर ऊर्जेवर अभ्यास करण्यास आणखी प्रेरणा देत राहील. या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून पनवेल येथील उद्योजक आशिष पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.

काय आहे ‘या’ उपकरणाचा उपयोग 

नीलेश मोने यांनी तयार केलेल्या सोलर ड्रायरमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, जसे कांदा, कारले, आले, ओली हळद, आवळा आदी एका दिवसात सुकविता येतात. सुकविलेले जिन्नस 6 महिने ते एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकता. त्यामुळे हंगाम नसताना आणि किंमती वाढलेल्या असताना हे जिन्नस सहज उपलब्ध होऊन वापरता येऊ शकतात. सोलर ड्रायर विविध आकारात आणि किंमतीत उपलब्ध आहे. वापरण्यास अतिशय सोपे आणि नाममात्र खर्चिक आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Mumbai School Reopen: पालकांच्या परवानगीनंतरचं विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश, शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -