Mamata Banerjee Mumbai Visit : मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी , शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तीन नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला सुरूवात झाली असून नेमकी कोणत्या विषयांवर बैठक होत आहे. यांसंर्दभातील माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. परंतु ममता बॅनर्जी मुंबईत तीन दिवसीय दौऱ्यासाठी आल्या असून त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पहिली भेट ही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दिली आहे.

मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यासाठी आले आहे. मला येथे येऊन फार बरे वाटले. मी आता खूप आनंदी असून जय मराठा, जय बांग्ला अशा प्रकारची घोषणा ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. सिद्धिविनायक मंदिराला भेट दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला भेट दिली. ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा समजला जात असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उद्या शरद पवारांची घेणार भेट

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या(बुधवार) भेट घेणार आहेत. उद्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट देणार आहेत.
ममता बनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी म्हणाल्या की, मला जो संदेश द्यायचा आहे. तो मी देणार आहे. त्यामुळे मुंबईला आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी भेट देणार नाही, असं शक्य नाहीये. त्यामुळे उद्या(बुधवार) मी शरद पवार यांच्या घरी भेट देणार आहे.


हेही वाचा: Mamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल दोन दिवसीय दौरा?