घरठाणेCentral Railway : ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते...

Central Railway : ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, 36 अतिरिक्त उपनगरीय लोकल फेऱ्या वाढणार

Subscribe

दिवा आणि ठाणे दरम्यान दोन ट्रॅक कमी असल्याने प्रत्येकी ९.४४ किमीचा बॉटल नेक असल्यामुळे क्षमता कमी होत होती. आता कुर्ला/लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते कल्याण (३६ किमी) पर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये उपनगरीय (२ धिम्या उपनगरीय मार्गावर, २ जलद उपनगरीय मार्गावर) आणि लांब पल्ल्याच्या गाड्या (२ मार्गावर) साठी स्वतंत्र कॉरिडॉर असलेले सहा रेल्वे मार्ग आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  ठाणे – दिवा ५वा आणि ६वा रेल्वे मार्गाचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करतील तसेच ठाणे आणि दिवा येथून अतिरिक्त उपनगरीय सेवांना हिरवा झेंडा दाखवतील. राज्यापाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सामील होतील.

ठाणे येथील समारंभात माननीय रेल्वे दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के,खासदार श्रीकांत शिंदे,  कुमार केतकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे ,प्रमोद (राजू) पाटील,आमदार संजय केळकर आणि इतर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे विलीन होते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाते. २००८ पूर्वी येथे ४ रेल्वे मार्ग (ट्रॅक) होते. धिम्या रेल्वे मार्गासाठी २ रेल्वे मार्ग (ट्रॅक) आणि जलद उपनगरीय ट्रेन, मेल एक्सप्रेस व मालवाहतूकीसाठी २ रेल्वे मार्ग (ट्रॅक) वापरण्यात येत असत. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करण्यासाठी, कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान टप्प्याटप्प्याने २ अतिरिक्त रेल्वे मार्गाचे (ट्रॅकचे) नियोजन करण्यात आले.

कल्याण आणि दिवा दरम्यान २००७-०८ मध्ये आणि २०११-१२ मध्ये दिवा आणि ठाण्याच्या दोन्ही बाजूला ठाणे- कुर्ला दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि कुर्ला यार्डला जोडणाऱ्या २ अतिरिक्त मार्गांचे काम पूर्ण झाले. दिवा आणि ठाणे दरम्यान दोन ट्रॅक कमी असल्याने प्रत्येकी ९.४४ किमीचा बॉटल नेक असल्यामुळे क्षमता कमी होत होती.
आता कुर्ला/लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते कल्याण (३६ किमी) पर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये उपनगरीय (२ धिम्या उपनगरीय मार्गावर, २ जलद उपनगरीय मार्गावर) आणि लांब पल्ल्याच्या गाड्या (२ मार्गावर) साठी स्वतंत्र कॉरिडॉर असलेले सहा रेल्वे मार्ग आहेत. विशेषत: कुर्ला/लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पासून/पर्यंत निघणाऱ्या गाड्यांसाठी असतील.

- Advertisement -

सुधारित वेळापत्रक

• मेन लाईनवर 36 अतिरिक्त सेवा. मेन लाईनवरील एकूण सेवांची संख्या 858 वरून 894 पर्यंत वाढणार.
• मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1774 वरून 1810 पर्यंत वाढणार
• मेन लाईनवर एकूण वातानुकुलीत उपनगरीय सेवांची संख्या 10 वरून 44 पर्यंत वाढणार म्हणजेच मेन लाईनवर 34 नवीन वातानुकुलीत उपनगरीय सेवा. 44 वातानुकुलीत सेवांपैकी 25 वातानुकुलीत सेवा जलद सेवा म्हणून चालतील म्हणजेच 24 जलद आणि एक अर्ध जलद
• जलद लाईन सेवांची एकूण संख्या 257 वरून 270 पर्यंत वाढणार म्हणजे 13 आणखी जलद लाईन सेवा
• एकूण धीम्या मार्गावरील सेवांची संख्या 601 वरून 624 पर्यंत वाढणार आहे, म्हणजे आणखी 23 धीम्या मार्गावरील सेवा
• 5व्या आणि 6व्या मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे काही अर्ध-जलद सेवा जलद किंवा धीम्या सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या.

मेन लाईनवरील 44 वातानुकुलीत उपनगरीय सेवा 3 वातानुकुलीत रेक वापरून चालवल्या जातील, ह्या वातानुकुलीत उपनगरीय सेवांचा तपशील खालीलप्रमाणे असेल –

वातानुकुलीत – सेवा (लिंक – 1)

1. C-4 धीमी लोकल कुर्ला येथून 04.46 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 05.16 वाजता पोहोचते
2. K-1 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 05.20 वाजता सुटणारी कल्याणला 06.24 वाजता पोहोचते
3. K-10 जलद लोकल कल्याणहून 06.32 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 07.39 वाजता पोहोचते
4. K-17 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 07.43 वाजता सुटणारी कल्याणला 08.46 वाजता पोहोचते
5. K-36 जलद लोकल कल्याणहून 08.54 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 09.59 वाजता पोहोचते
6. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 10.04 वाजता सुटणारी K-35 जलद लोकल 11.07 वाजता कल्याणला पोहोचते
7. DK-8 जलद लोकल कल्याणहून 11.22 वाजता सुटणारी दादरला 12.15 वाजता पोहोचते
8. DBL-3 जलद लोकल दादरहून 12.30 वाजता सुटणारी बदलापूरला 13.39 वाजता पोहोचते
9. BL-36 जलद लोकल बदलापूरहून 13.48 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.14 वाजता पोहोचते
10. TL-37* जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 15.19 वाजता सुटणारी टिटवाळ्याला 16.39 वाजता पोहोचते
11. TL-50* जलद लोकल टिटवाळा येथून 16.47 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.06 वाजता पोहोचते
12. T-109 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 18.10 वाजता सुटणारी ठाण्याला 18.52 वाजता पोहोचते
13. T-124 धीमी लोकल ठाण्याहून 18.57 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 19.55 वाजता पोहोचते
14. K-117 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 20.00 वाजता सुटणारी कल्याणला 21.28 वाजता पोहोचते
15. K-130 धीमी लोकल कल्याणहून 21.36 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 23.05 वाजता पोहोचते
16. T-147* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 23.12 वाजता सुटणारी ठाण्याला 00.07 वाजता पोहोचते

वातानुकुलीत – सेवा (लिंक – 2)

1. T-32 जलद लोकल ठाण्याहून 08.02 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 08.50 वाजता पोहोचते
2. K-27 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 08.56 वाजता सुटणारी कल्याणला 09.58 वाजता पोहोचते
3. DK-6 जलद लोकल कल्याणहून 10.02 वाजता सुटणारी दादरला 10.52 वाजता पोहोचते
4. DBL-1 जलद लोकल दादरहून 11.08 वाजता सुटणारी बदलापूरला 12.21 वाजता पोहोचते
5. BL-32 जलद लोकल बदलापूरहून 12.27 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 13.53 वाजता पोहोचते
6. T-77 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 14.03 वाजता सुटणारी ठाण्याला 14.46 वाजता पोहोचते
7. T-88 जलद लोकल ठाण्याहून 15.03 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.45 वाजता पोहोचते
8. K-83 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 16.10 वाजता सुटणारी कल्याणला 17.18 वाजता पोहोचते
9. K-94 जलद लोकल कल्याणहून 17.27 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.30 वाजता पोहोचते
10. K-103 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 18.36 वाजता सुटणारी कल्याणला 19.41 वाजता पोहोचते
11. K-122 धीमी लोकल कल्याणहून 19.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 21.28 वाजता पोहोचते
12. K-125 अर्ध जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 21.42 वाजता सुटणारी कल्याणला 23.05 वाजता पोहोचते
13. DK-16 धीमी लोकल कल्याणहून 23.11 वाजता सुटणारी दादरला 00.21 वाजता पोहोचते
14. DT-1 धीमी लोकल दादरहून 00.29 वाजता सुटणारी ठाण्याला 01.05 वाजता पोहोचते

वातानुकुलीत – सेवा (लिंक – ३)

1. T-24 धीमी लोकल ठाण्याहून 07.04 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 08.00 वाजता पोहोचते
2. T-19 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 08.04 वाजता सुटणारी ठाण्याला 08.46 वाजता पोहोचते
3. T-46 जलद लोकल ठाण्याहून 09.03 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 09.47 वाजता पोहोचते
4. A-15 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 09.51 वाजता सुटणारी अंबरनाथला 11.08 वाजता पोहोचते
5. A-30 धीमी लोकल अंबरनाथहून 11.17 वाजता सुटणारी 13.02 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते
6. T-71 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 13.06 वाजता सुटणारी ठाण्याला 14.06 वाजता पोहोचते
7. T-86 धीमी लोकल ठाण्याहून 14.22 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.20 वाजता पोहोचते
8. DL-29 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 15.24 वाजता सुटणारी डोंबिवलीला 16.43 वाजता पोहोचते
9. DL-36 धीमी लोकल डोंबिवलीहून 16.55 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.14 वाजता पोहोचते
10. DL43* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 18.18 वाजता सुटणारी डोंबिवलीला 19.37 वाजता पोहोचते
11. DL-48* धीमी लोकल डोंबिवलीहून 19.50 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 21.12 वाजता पोहोचते
12. K-123* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 21.16 वाजता सुटणारी कल्याणला 22.45 वाजता पोहोचते
13. K-138* धीमी लोकल कल्याणहून 22.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 00.27 वाजता पोहोचते
14. C-3* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 00.31 वाजता सुटणारी कुर्ला येथे 01.00 वाजता पोहोचते

(*) चिन्हांकित सेवा रविवारी/सुट्टीच्या दिवशी विना-वातानुकुलीत रेकसह चालतील.

 

वैशिष्ट्ये

  • MUTP II अंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर असलेला हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समान खर्चाच्या वाटणीसह रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) द्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • प्रत्येकी ९.४४ किमी लांबीची विद्युतीकृत दुहेरी लाईन.
  • अंदाजे रू. ६२० कोटी खर्च.
  • ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांतून जाणारा रेल्वेमार्ग
    ६ प्लॅटफॉर्म आणि ८ फूट ओव्हर ब्रिज आणि पादचारी पूलांचा विस्तार असलेला रेल्वे मार्ग.
  • १.४ किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल.
  •  १७० मीटर लांबीचा बोगदा.

फायदे

  • कुर्ला ते कल्याण या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ल्याजवळ) येथून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय वाहतुकीला अडथळा न आणता ५व्या आणि ६व्या मार्गावर कल्याणपर्यंत जाऊ शकतात. यामुळे रेल्वेचे कामकाज चांगले होईल.
  • ३६ अतिरिक्त उपनगरीय सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान आणि पुढे (३४ वातानुकूलित आणि २ विना-वातानुकूलित) सुरू केल्या जातील.
  •  कळवा, मुंब्रा या कॉरिडॉरच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल कारण मेगाब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्या एकाच कॉरिडॉरमध्ये प्रवाशांना सेवा पुरवतील.

हेही वाचा – Water Taxi : देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबईतून सुरू ! सागरमाला प्रकल्पात पाच बंदरांच्या विकासाठी केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -