घरताज्या घडामोडीकाँग्रेस पक्ष उभारी घेत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली- महेंद्र घरत

काँग्रेस पक्ष उभारी घेत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली- महेंद्र घरत

Subscribe

देशातील राजकारण एक वेगळ्या दिशेने चालले असून सर्व सामन्यांच्या मनात केंद्र सरकारच्या विरोधात एक चीड निर्माण झाली आहे.

प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद आमच्यात असून जिल्हाभरात कार्यकर्त्यांना बळ देऊन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम पुढील काळात करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पेणमध्ये दिली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष आता पुनः उभारी घेत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे सांगत विरोधकांना टोल लगावला.यावेळी बोलताना महेंद्र घरत यांनी, देशातील राजकारण एक वेगळ्या दिशेने चालले असून सर्व सामन्यांच्या मनात केंद्र सरकारच्या विरोधात एक चीड निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येकाला आता काँग्रेसचे सरकार हवे असल्याची भावना निर्माण झाली आहे. राज्यात नाना पटोले यांच्या सारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी ठाम असून त्यांच्या आदेशनुसार जे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. जे येणार नाहीत त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचे असे धोरण अवलंबिले असून पक्ष वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान दिले तर काहीही अशक्य नाही, असे घरत यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष, सर्वधर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे योगदान असून नवतरुणांनाही पक्षाचे ध्येय धोरण समजावून त्यांना पक्षात सामावून घेतले पाहिजे असे महेंद्र घरत यांनी सांगितले. पेणमधील काँग्रेस कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे ते म्हणाले. चक्रीवादळ, कोरोना संकट, शेतकर्‍यांचे प्रश्न, मच्छिमारांचा मोबदला अशा अनेक गोष्टींसह सर्व सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे घरत यांनी कौतुक केले.

- Advertisement -

पेण तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सत्कार सोहोळ्याचे आयोजन गांधी मंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेणमधून रॅली काढली.


हे ही वाचा – चौकशीसाठी मी ईडी कार्यालयात जाणार – अनिल परब

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -