घरताज्या घडामोडीएक्को पॉइंटवर मद्यधुंद तरूणाची आत्महत्येची नौटंकी

एक्को पॉइंटवर मद्यधुंद तरूणाची आत्महत्येची नौटंकी

Subscribe

पोलीस व रेस्क्यु टिमने वाचवले तरूणाचे प्राण

माथेरान पर्यटन स्थळावर विकेंडमध्ये अनेक पर्यटक फीरण्यासाठी येत असतात. सध्या आषाढ महिना असल्याने ओली पार्टी करण्यासाठी शनिवार व रविवार येथे तळीरामांची संख्या देखील तेवढ्याच प्रमाणात असते. रविवारी १ ऑगस्ट रोजी माथेरानचा एक्को पॉइंट गजबजलेला असताना दिवा येथे राहणारा नितीन इंदुलकर या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने आत्महत्येसारखा बनाव करत येथील दरीच्या टोकावर जाऊन बसला होता.
सदर घटनेतील मद्य धुंद युवक इको आणि कींग एडवर्ड या दोन्ही पॉइंटच्या मधोमध असलेल्या १५०० फुट खोल दरीच्या टोकावर जाऊन बसला असल्याचे येथील व्यावसायिक व उपस्थित पर्यटकांच्या निदर्शनात आला. यावेळी सदर युवकाला समजावून रेलींगच्या आत येण्याची विनवणी केली. मात्र हा तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. येथील स्थानिक व्यवसायिकांनी सदर घटनेची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता माथेरान पोलीसांनी सह्याद्री रेस्क्यु टिम सोबत घटनास्थळ गाठले.
 माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राहुल पाटील तसेच रेस्क्यु टिमचे संतोष केळगणे यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला समजावत त्याच्याशी सलोख्याने बोलत सदर दरीच्या टोकावरून सुरक्षा रेलींगच्या आत घेऊन आले. यानंतर त्या युवकाला माथेरान पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलीस हवालदार महेंद्र राठोड, पोलीस शिपाई राकेश काळे यांनी चौकशी केली असता सदर युवका सोबत अजून ८ मित्र असल्याचे समजले यावेळी सर्व मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले त्यावेळी सोबत असलेले मित्र देखील मद्य प्राशन केलेल्या स्थितीत आढळून आलेत.सदर युवकाला या पॉइंट वर सोडून बाकीचे मित्र पॉइंट फीरण्यासाठी  निघून गेल्याने  स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासन तसेच रेस्क्यु टीमची यंत्रणेची भांबेरी उडाली होती. या प्रकारची डोंबिवली,ठाणे,दिवा येथील फीरण्यासाठी आलेल्या सर्व मद्यधुंद तरुणांना जाणीव करुन देण्यासाठी पोलीसी खाक्याद्वारे चांगलीच समज देण्यात आली.
                                                                                                        -दिनेश सुतार,माथेरान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -