घरअर्थजगतअंबानींची कंपनी अदानी खरेदी करणार, रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

अंबानींची कंपनी अदानी खरेदी करणार, रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

Subscribe

मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे आता ही कंपनी गौतम अदानी ही कंपनी खरेदीसाठी तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शियल सर्व्हिसेससह केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह १४ मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली सादर करण्याची अंतिम तारीख ११ मार्चहोती. ती वाढवून २५ मार्च अशी केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी, RBI ने रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड प्रशासनाच्या अभावामुळे आणि पेमेंट डिफॉल्टमुळे विसर्जित केले.

दरम्यान, रिलायन्स कॅपिटलला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे. यामध्ये अर्पवूड, वर्दे पार्टनर्स,मल्टीपल्स पार्टनर्स, निपॉन लाईफ, जेसी फ्लॉवर्स, ब्रुकफिल्ड, ऑक्ट्री, अपोलो ग्लोबल, ब्लॅकस्टोन आणि हिरो फिनकॉर्प यांचा समावेश आहे. ही तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे जिच्या विरुद्ध मध्यवर्ती बँकेने अलीकडेच दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता अंतर्गत दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे. इतर दोन कंपन्या Srei Group NBFC आणि दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (DHFL) आहेत.

- Advertisement -

रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांबद्दल बोलायचे तर त्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट री-कन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.

कंपनीवर ४० हजार कोटींचं कर्ज

सप्टेंबर २०२१ मध्ये, रिलायन्स कॅपिटलने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले होते की कंपनीवरील एकूण कर्ज ४० हजार कोटी आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा १७५९ कोटी रुपयांवर आला होता. तर डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा ३९६६ कोटी रुपये होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -