घरताज्या घडामोडीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिका वापरा, जितेंद्र आव्हाडांची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिका वापरा, जितेंद्र आव्हाडांची मागणी

Subscribe

राज्यात सध्याच्या घडीला मतदानाची प्रक्रिया ही ईव्हीएम मशीनद्वारे पूर्ण होते. या ईव्हीएम मशीनबाबत अद्यापही संशयाचे वातावरण लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा आहे. ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्याच्या अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत. यामुळे ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणी राजकीय नेते करत असतात. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांचा वापर करुन घ्याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच या संदर्भातचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्या अशी मागणी केली आहे. आव्हाड म्हणाले की, “अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात”

- Advertisement -

निवडणुका घेण्याचा निर्णय राज्याचा

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुका घेण्याचा निर्णय़ हा राज्य सरकारचा असतो असे सांगितले आहे. यावेळी त्यांना कर्नाटकचा दाखला दिला. तिकडे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या असल्याचे समजत आहे. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका उपस्थित होत असतात यामुळे प्रयोग म्हणून तरी राज्यातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Raut Vs Fadnavis : फडणवीसांच्या प्रश्नाला राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले, मी मर्द शिवसैनिक…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -