घरअर्थजगतपुढील वर्षांत...., रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेवरून व्यक्त केली चिंता

पुढील वर्षांत…., रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेवरून व्यक्त केली चिंता

Subscribe

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे भारतासह संपूर्ण जगाची आर्थिक गती मंदावली आहे. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्याने परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रत्येक देशाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यातच, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन (Former RBI Governor Raghuram Rajan) यांनी महत्त्वाचं आणि चिंता वाढवणारं विधान केलं आहे. येणारं पुढील वर्ष हे भारतासाठी नव्हे तर जगातील अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे, असं रघुराम राजन म्हणाले. ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होती. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत देशासमोरील आर्थिक आव्हानांचा उहापोह केला.

हेही वाचा – मंदीचं सावट! अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यंदा सातव्यांदा व्याजदर वाढवला

- Advertisement -

देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागणार आहेत. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून काही धोरणे आखावी लागणार आहेत. कोरोनामुळे खंगलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज आहे, असं रघुराम राजन म्हणाले.

कोरोना काळात अनेकांना फटका बसला. मात्र, उच्च मध्यमवर्गीयांचं उत्पन्न वर्क फ्रॉम होममुळे वाढले. परंतु, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात असमानता वाढली, असंही रघुराम राजन म्हणाले. देशात आता सेवा क्षेत्रात क्रांती होऊ शकते, असंही ते म्हणाले. तसंच, देशात आता नवीन प्रकारची हरितक्रांती घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – ४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर, राज्यसभेत सरकारकडून माहिती

येणारं वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. जगभरात विकासाची गती मंदावली आहे. भारतावरही याचा परिणाम दिसतोय. निर्यात थोडी कमी झाली आहे. महागाईदेखील भारताच्या विकासासाठी अडथळा ठरत आहे. बेरोजगारी वाढत असून आता खासगी क्षेत्राने नोकऱ्यांसाठी पुढे यावे. कारण, सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळू शकत नाही, असं रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं.

देशात हरितक्रांती घडून येऊ शकते. बदलते हवामान लक्षात घेता पवनचक्की उभारण्यासारखे प्रकल्प आपण हाती घेऊ शकतो. तसंच, पर्यावरणपूरक इमारतींमध्ये भारत अग्रेसर होऊ शकतो, असा आशावादही राजन यांनी बोलून दाखवला. तसंच, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कृषी क्षेत्रातही रोजगार निर्मिती होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -